Grape Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष संघाच्या प्रयोगशाळेचा उपयोग करून घ्यावा

Grape Production : द्राक्ष उत्पादकांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे, द्राक्षाची गुणवत्ता अधिकाधिक कशी वाढवता येईल, यावर भर दिला पाहिजे.

Team Agrowon

Solapur News : द्राक्ष उत्पादकांसाठी बागायतदार संघाने अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे, या प्रयोगशाळेचा उपयोग द्राक्ष उत्पादकांनी करून आपल्या द्राक्षाची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर विभाग अध्यक्षपदी बार्शीचे राजेंद्र देशमुख आणि मानद सचिवपदी शंकर येणगुरे (कासेगाव) यांची बिनविरोध निवड झाली आहे, या पदाधिकाऱ्यांचा सत्कार द्राक्ष संघाचे राज्य खजिनदार शिवाजीराव पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव चाकोते यांच्या हस्ते करण्यात आला.

त्या वेळी सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. या वेळी मावळते अध्यक्ष प्रशांत देशमुख, गौसअहमद शेख उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, संघाने आता अलीकडेच अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा उभारली आहे,

द्राक्षासाठी माती, पाणी परीक्षणासह देठ परीक्षणाची सुविधा इथे आहे. द्राक्ष उत्पादकांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे, द्राक्षाची गुणवत्ता अधिकाधिक कशी वाढवता येईल, यावर भर दिला पाहिजे.

त्याशिवाय दर्जेदार खते आणि सूक्ष्मअन्नद्रव्ये पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. या वेळी संघाचे खजिनदार पवार आणि ज्येष्ठ संचालक चाकोते यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना, संघाकडून शेतकऱ्यांना अधिकाधिक सहकार्य आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT