Grape Fruit Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळछाटणी अंतिम टप्प्यात

जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील द्राक्ष पिकाची फळ छाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत उर्वरित छाटणी पूर्ण होईल,

टीम अॅग्रोवन.

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील द्राक्ष (Grape) पिकाची फळ छाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत उर्वरित छाटणी पूर्ण होईल, अशी शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे (Rainfall) घड कूज, घड जिरणे यामुळे १० टक्के नुकसान (Grape Crop Damage) झाले आहे. सध्या द्राक्ष बागांस पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामात फळ छाटणी तब्बल एक महिना उशिरा सुरू झाली. सुरुवातीच्या काळात बागेला पोषक वातावरण होते; मात्र, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. परिणामी छाटणी केलेल्या बागा फुलोरावस्थेत, पोंगा अवस्थेत होत्या. परिणामी या पावसाचा फटका बागांना बसला.

त्यामुळे घड कूज, घड जिरणे या सारख्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी फळछाटणी करणे थांबवले. मूळात गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे यंदाही द्राक्षाचे नुकसान होते की, काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती.

ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना द्राक्षावर फवारणी करण्यास अथडळे येत होते. त्यातूनही बागा जगवण्यासाठी धडपड सुरू होती. त्यानंतर फळ छाटणीस गती आली. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९० टक्के फळ छाटणी पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरात फळ छाटणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत.

यंदा नाताळनिमित्त द्राक्ष बाजारात येणार का?

दरवर्षी नाताळ सणानिमित्त द्राक्ष बाजारपेठेत येतात. परंतु गेल्या तीन वर्षांपासून हंगामावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या संकाटांमुळे नाताळनिमित्त बाजारपेठेत द्राक्षाची फारशी आवक होत नसल्याचे चित्र आहे. यंदा नाताळनिमित्त द्राक्ष बाजारपेठेत येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवडाभरात छाटणी पूर्ण होईल. बागांना पोषक वातावरण असल्याने वेलींवर घडांची संख्या आणि दर्जा चांगला आहे.

- महादेव लाड, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कुंडल, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT