Gram Panchayat Award Agrowon
ॲग्रो विशेष

Samruddha Gram Competition: मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी ग्रामपंचातींनी सज्ज व्हावे

Gram Panchayat Award: ग्रामपंचायतींनी स्वच्छ, सुंदर व प्लॅस्टिकमुक्त गावांचा आदर्श निर्माण करून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

गणेश कोरे

Pune News: स्वच्छ, सुंदर व प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतींनी महत्त्वाची भूमिका बजावावी व शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल वारीचा प्रारंभ तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास योजनेतील पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गोरे बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, ‘‘आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून पालखीतळ व मार्गावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे.

राष्ट्र संत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायती :

प्रथम : शेळकेवाडी (करवीर, कोल्हापूर), द्वितीय : बोरगाव (कवठे महांकाळ, सांगली), तृतीय : कवठे (खंडाळा, सातारा)

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विशेष पुरस्कार :

स्व. वसंतराव नाईक पुरस्कार - दरेवाडी (सातारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - ग्रामपंचायत सांडगेवाडी (सांगली), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार - गोयेगाव (सोलापूर)

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभिमान जिल्हास्तरीय पुरस्कार :

ग्रामपंचायत गावडेवाडी (प्रथम ः ६ लाख), मांजरी खुर्द (द्वितीय : ४ लाख), सदोबाची वाडी (तृतीय : ३ लाख रुपये)

विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती

स्व. वसंतराव नाईक पुरस्कार - चिंचोली (जुन्नर, जि. पुणे)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - ग्रामपंचायत टाकवे खु.(मावळ, जि. पुणे)

स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार - मांजरवाडी (जुन्नर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT