Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply : पाणीपुरवठा बैठकीला ग्रामपंचायत सचिवच गैरहजर

ग्रामीण भागातील हातपंप व त्यांची दुरुस्ती आणि नवे हातपंप लावण्याची सूचना उपस्थित सरपंचांनी केली.

Team Agrowon

Amravati Water Supply News : चांदूर रेल्वे तालुक्यातील उन्हाळ्यातील पाणीपुरवठाविषयक (Water Supply) आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला आवश्‍यक असतानाही सचिव, तलाठी गैरहजर असल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आमदारांनी दिले आहेत.

चांदूर रेल्वे तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या (Water Storage Issue) निर्माण होते. त्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या उपायोजनांबाबत आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सभेला तहसीलदार राजेंद्र इंगळे, पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी खारकर, माजी सभापती देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक विस्तार अधिकारी उमप यांनी केले.

ग्रामीण भागातील हातपंप व त्यांची दुरुस्ती आणि नवे हातपंप लावण्याची सूचना उपस्थित सरपंचांनी केली. नादुरुस्त हातपंपांसाठी ग्रामपंचायतीकडून २५०० रुपये भरणा झाला नसल्याची माहिती देण्यात आली.

केंद्राच्या ‘हर घर नलसे जल’ योजनेत प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणीपुरवठ्याचा खर्च शासकीय निधीतून केला जात आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी गतीने करावी, असे आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केले.

तथापि, बहुतांश गावातील सचिवांनी ग्रामपंचायतस्तरावर अशा योजनेबाबत माहिती दिली नसल्याचे या वेळी सरपंचांनी सांगितले.

तसेच सभेला गैरहजर ग्रामसचिव व तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी केली. या प्रकाराची दखल घेत आमदार अडसड यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT