Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

Jalgaon Local Body Election : जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी एक हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी एक हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्जांची छाननी झाली असून, बुधवारी (ता. २५ ) माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

निवडणुकीसंबंधी रंग भरू लागला आहे. गावोगावी पॅनलचे गठन, विरोधकांना शह देण्याचे आडाखे बांधले जात असून, शेतीकामांसोबत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे नियोजनही सुरू असल्याचे दिसत आहे.

गावोगावी फोडाफोडी व कुरघोडीचे राजकारणही सुरू असून, अनेक भागात आमदार, मंत्र्यांनी लक्ष घालून आपापले समर्थक कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्नशील आहेत.

जळगाव तालुक्यात १५ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुका, तर दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होणार आहे. यासाठी जळगाव तालुक्यात एकूण ३९२ अर्ज दाखल झाले. त्यात सदस्य पदासाठी ३२२ तर सरपंच पदासाठी ७० अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक कार्यक्रम

१६ ते २० ऑक्टोबर अर्ज दाखल करणे

२३ ऑक्टोबर अर्जांची छाननी

२५ ऑक्टोबर अर्ज माघारी, चिन्हवाटप

मतदान ५ नोव्हेंबर

निवडणुका होणारे

तालुके व ग्रामपंचायती

तालुका सार्वत्रिक निवडणुका पोट

निवडणुका

पारोळा ११ ९

भडगाव ८ ५

अमळनेर १४ ११

चाळीसगाव १० १२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT