Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement : पेरा नोंदणीअभावी शासकीय तूर खरेदी रखडली

Tur Market : हमीभावाने तूर खरेदीसाठी ता. २४ जानेवारीपासून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरु झाली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : हमीभावाने तूर खरेदीसाठी ता. २४ जानेवारीपासून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरु झाली आहे. यासाठी पणन महासंघाच्या २१ खरेदी केंद्रांवर १३ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. परंतु नऊ केंद्रांवर केवळ ४१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

तर एका केंद्रावर १९ क्विंटल तूर खरेदी झाली. ऑनलाइन पेरा नोंदणी नसल्यामुळे तूर खरेदी रखडली आहे. परिणामी, हजारो शेतकरी तूर विक्रीविना वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबत मार्ग काढून शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एनसीसीएफच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या वतीने (पणन महासंघ) २१ तर विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या पाच अशा एकूण २७ खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे. या ठिकाणी तूर खरेदीसाठी ता. २४ जानेवारीपासून तीस दिवसांपर्यंत ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीसाठी मुदत होती.

या केंद्रावर तूर खरेदी ता. १३ फेब्रुवारीपासून सुरू झाली. परंतु अपेक्षित नोंदणी झाली नसल्याने राज्य शासनाने पुन्हा ३० दिवसाची मुदतवाढ दिली. दरम्यान, या काळात शेतकऱ्यांना तुरीचा ऑनलाइन पीकपेरा नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परंतु शेतकऱ्यांच्या सातबारावर तुरीचा पेरा नोंद नसल्यामुळे पणनच्या ३१ पैकी नऊ खरेदी केंद्रावर ४१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यातील गणेशपूर (ता. किनवट) येथील खरेदी केंद्रावर केवळ १९ क्विंटल तुरीची खरेदी झाली. अनेक शेतकऱ्यांकडे तुरीचा पेरा नोंदविलेला नाही.

यामुळे शेतकऱ्यांना तूर खासगी बाजारात देण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारात तुरीचे दर हमी दरापेक्षा पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत खाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कमी दराने तूर बाजारात विकावी लागत आहे.

शासनाने तुरीचा पेरा नोंदणी संदर्भात मार्ग काढून हस्तलिखित पेरा घेण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. किंवा सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून घेत असलेल्या तुरीची पेरणी गृहीत धरून सोयाबीनच्या २५ टक्के पेरा तुरीचा समजून खरेदीसाठी आदेश काढावेत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खरिपात सोयाबीन व कपाशी या मुख्य पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतली जाते. पीकपेर्‍याची नोंद करताना तुरीचा पेरा नोंदला जात नाही. यामुळे तुरीचे उत्पादन होवूनही आम्हाला शासकीय केंद्राला तूर देता येत नाही. सध्या बाजारात तुरीचे दर पडले आहेत. यामुळे शासनाने यातून मार्ग काढावा.
- अविनाश पाटील, शेतकरी, कोटग्याळवाडी ता. मुखेड.
हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी ता. २४ जानेवारीपासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. आता ही मुदत आणखी ३० दिवस वाढविण्यात आली आहे. पणन महासंघ जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करणार आहे. केंद्र शासनाने तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ५५० रुपये हमी दर जाहीर केला आहे. यामुळे तुरीचा ऑनलाइन पेरा नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणार्‍या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे.
- राजेश हेमके, जिल्हा पणन अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT