Mantralay Agrowon
ॲग्रो विशेष

War Room : दुष्काळ निवारणासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मंत्रालयात उभारली 'वॉर रुम'

State Level War Room : माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Swapnil Shinde

Maharashtra Drought : यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशीर केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने मंत्रालयात वाॅर रुम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाॅर रुममधून आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राज्याचा आढावा घेणार आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी माॅन्सूनचा पाऊस झाला. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे.

त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यभरात सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. या मोठ्या तुटीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यातही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. कमी पावसामुळं बाजरी, मूग, कपाशी, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

अनेक गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा सुरू झाले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावणीची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्ह आहेत.

दुष्काळ निवारणासाठी अंमलबजावणीसाठी आता सरकारने कंबर कसली आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ निवारण अंमलतबजावणीत कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये आणि काही समस्या निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 'वॉर रूम'ची उभारणी केली आहे. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून या वाॅर रुमचे कंट्रोल होणार आहे.

त्यासाठी काही अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आला आहे. या वाॅररुम मधून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रुमशी संलग्न असणार आहे, वॉर रुमला प्रत्येक जिल्ह्यातून पिण्याचे पाण्याचे टॅंकर, जनावरांचा चारा छावणी, तसेच पिकांचा आढावा घेतला जाणार आहेत. टंचाईग्रस्त गाव, तालुके, जिल्हे, विभाग यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT