ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : नाशिक : पश्चिम खोऱ्यातील वाहून जाणारे ६५ टीएमसी पाणी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे महत्त्वाचे नियोजित असून यासाठी ५० ते ६० हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करून गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
यूथ फेस्टिवल मैदान येथे आयोजित कृषी महोत्सव २०२५ समारोप कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते. या वेळी आमदार छगन भुजबळ, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अण्णासाहेब मोरे, आबासाहेब मोरे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाण्याचे नियोजन करतांना बिगर सिंचन क्षेत्रासाठी असेलेले पाण्याचे काटकोर नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभाग व नाशिक महानगरपालिका यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीक्षेत्रात होणारे बदल स्वीकारतांना येणाऱ्या काळात निर्यातक्षम शेतीसाठी अधिक संधी कशा उपलब्ध होतील यासाठी अधिक प्रयत्नांवर भर देण्यात येणार आहे.
यासाठी जैविक शेती व सेंद्रिय खतांचा वापर करून कमी खर्चात शेतीची उत्पादकता अधिक वाढण्याच्या कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतीपूरक दुग्ध व्यवसायास अधिक चालना देण्यासह शेती उत्पादनांची विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे योगदान
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशात सर्वांत जास्त गुंतवणूक या क्षेत्रात केली जाणार आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे विखे-पाटील यांनी या वेळी नमूद केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.