Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Industry : शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यास शासन प्रयत्नशील

Ramesh Bais : शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (ता. २१) केले.

Team Agrowon

Nashik News : ‘‘मी स्वत: शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (ता. २१) केले.

इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावात मंगळवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत कृषी विभागामार्फत ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी बैस बोलत होते. या वेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर,

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, राज्यपालांच्या सचिव श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सहायक जिल्हाधिकारी जितीन रेहमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.

शिरसाटे गावातील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र केदार यांच्या शेतातील टोमॅटो पिकावर ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक बैस यांच्यासमोर सादर करण्यात आले. या वेळी ‘इफ्को’चे क्षेत्र अधिकारी निमिष पवार, कृषी विज्ञान केंद्र मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षण सहयोगी हेमराज राजपूत यांनी नॅनो युरिया फवारणी बाबतची तांत्रिक माहिती व फायदे विशद केले.

‘शेतीला दिवसा वीज द्या’

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. यातच शेतीला दिवसा वीज मिळत नाही. ग्रामीण भागात आठ-आठ तास वीज नसते. शेतीला दिवसा वीज व पाणी मिळावे, शेतीला जोडधंदा मिळावा, असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी राज्यपालांसमोर मांडले. शेतकरी भास्कर मते यांनी सेंद्रिय शेतीचा अनुभव सांगत, रासायनिक खतांचा वापर करीत नसून सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात, असे सांगितले. त्यावर बैस यांनी रासायनिक व सेंद्रिय खत वापरातून मिळालेल्या उत्पादनाबाबत जाणून घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT