Farmer demand MSP : मागील वर्षभरापासून पंजाब हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलक आंदोलन करत आहेत. परंतु केंद्र सरकारने त्यांची घेत नव्हतं. अखेर केंद्र सरकारने आता आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी आज (ता.१४) संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चासोबत चंडीगढ येथे बैठकीत चर्चा करणार आहेत. या बैठकीला शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल, सरवण सिंग पंढेर यांच्यासह २८ सदस्य उपस्थित राहणार आहेत. हमीभाव कायद्याची ग्यारंटीसह १२ अन्य मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारसोबत चर्चा पुढे घेऊन जाण्याचा शेतकरी नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. याबद्दल पंढेर म्हणाले, "शंभू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं. त्यासाठी शेतकरी महापंचायत आयोजित करण्यात आली. केंद्र सरकारशी आता चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे." असं पंढेर यांनी स्पष्ट केलं.
या बैठकीत जगजितसिंग डल्लेवाल प्रकृतीच्या कारणामुळे सहभागी होणार की नाही, याबद्दल साशंकता होती. परंतु संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाकडून गुरुवारी संध्याकाळी डल्लेवाल यांच्या या बैठकीत सहभागी होण्यावरून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली.
त्यानुसार डल्लेवाल या बैठकीत सहभागी होणार आहेत. शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्याचं उपोषण अद्यापही सुरूच आहे. केवळ वैद्यकीय उपचार या दरम्यान डल्लेवाल घेत आहेत.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा अराजकीय व किसान मंजूर मोर्चा यांच्याशी चर्चेसाठी संयुक्त सचिव प्रिय रंजन यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं.
या मंडळाशी १४ फेब्रुवारी रोजी आंदोलक शेतकरी नेत्यांनी चर्चा करावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार आज केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते यांच्यात चंडीगढ येथील महात्मा गांधी स्टेट इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन पंजाब येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.