Old Pension Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Old Pension Scheme : पशुवैद्यकांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा शासन आदेश जारी

Veterinarian Pension : राज्यात सर्वांत आधी या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांचा सत्कार करण्यात आला.

Team Agrowon

Nagpur News : शासन आदेशानुसार २००५ पूर्वी जाहिरात निघत त्यानंतर शासकीय सेवेत भरती झालेल्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी अशा २५ जणांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यासंबंधीचा आदेश काढला.

राज्यात सर्वांत आधी या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांचा सत्कार करण्यात आला. १ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जाहिरात असेल आणि त्यानंतर नोकरी भरती झाल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो.

राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप अनेक जिल्हा परिषद व तत्सम यंत्रणांकडून करण्यात आली नाही. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी मात्र यासाठी पुढाकार घेत शासन परिपत्रकानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला.

यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी अशा २५ जणांचा समावेश आहे. नागपूर जिल्हा परिषदेने शासन आदेशाची राज्यात सर्वांत आधी अंमलबजावणी केली.

याबद्दल पशु चिकित्सा व्यवसायी संघटना जिल्हा शाखा नागपूरच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कविता मोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबतच पशुधन पर्यवेक्षकांच्रुा प्रलंबित मागण्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.

राज्य कोशाध्यक्ष डॉ. पवन भागवत, विभागीय सचिव डॉ. गजानन काकड, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अमित तलमले, डॉ. श्‍वेता खरबीकर, डॉ. चंद्रकांत गडपाले, डॉ. वैशाली चरपे, डॉ. रूपाली पोटवार, डॉ. सपना मेश्राम, डॉ. माधुरी बेलेकर, डॉ. बबीता खापर्डे, डॉ. सीमा धुर्वे, डॉ. यज्ञेश्‍वर ढवळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT