Women's Policy Agrowon
ॲग्रो विशेष

Women's Policy : आता हंड्याचे ओझे पुरुषानेही उचलावे

Woman's Day : महिला दिनाचे औचित्य साधत राज्याचे चौथे महिला धोरण आणि कृती आराखडा सरकारने आज जाहीर केला.

Team Agrowon

Mumbai News : महिलांसाठी बँकेत विशेष खिडकी, महिला स्नेही हॉटेल, प्रत्येक वॉर्डमध्ये महिला तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. घरात पाणी भरण्याची जबाबदारी केवळ महिलेची असू नये यासाठी पाण्याचा हंडा पुरुषानेही उचलावा यासाठी राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत, अशाप्रकारचा कृती आराखडा चौथ्या महिला धोरणात आखण्यात आला आहे.

महिला दिनाचे औचित्य साधत राज्याचे चौथे महिला धोरण आणि कृती आराखडा सरकारने आज जाहीर केला. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. लिंग समानता पूरक उपजीविकेची साधने वृद्धिंगत करणे, लिंग समानता असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पोषक वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे.

वाहनावरील शुल्कात सवलत

व्यावसायिक वाहने महिलांच्या नावावर नोंदणी केल्यास शुल्कात सूट देण्याचा विचार केला जाईल. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे त्यावर लस उपलब्ध आहे. बाजारात या लसीची किंमत तीन हजारांपेक्षा जास्त आहे. ती कमी किमतीत देण्याचा विचार सुरू आहे.

संयुक्त मालकीला प्रोत्साहन

घराच्या संयुक्त मालकीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, शहर व औद्योगिक विकास महामंडळ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, राज्य महापालिका गृहनिर्माण योजनांची निर्मिती करणाऱ्या संस्थांनी राबविलेल्या विविध योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येईल.

शहरी भागात एकट्या राहत असलेल्या महिला व महिला प्रमुख असलेले कुटुंबे यांना घराची मालकी मिळवून देण्यासाठी पाठिंबा देणार आहे. वस्तू व सेवा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, तसेच मुद्रांक शुल्कातही सवलत देणार आहे.

या सवलती मिळणार

या धोरणानुसार पिवळे रेशन कार्डधारक महिलांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्याचा विचार केला जात आहे. तसेच सिंगापूरमॉडेलनुसार खासगी सेवेतील महिलांना जिथे सरकार प्रसूती रजेचा आर्थिक भार उचलते त्याप्रमाणे सुविधा देण्याचा विचार केला जात आहे.

एकल महिला, बेघर स्थलांतरित कुटुंब प्रमुख महिलांसह सर्व महिलांसाठी घरे व निवाऱ्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांना घराची मालकी मिळावी त्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT