Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करा

Shaktipeeth Highway Work : राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश सोमवारी (ता. १३) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १०० दिवस आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ हा विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येत असला तरी ते या बैठकीला अनुपस्थित होते. शिंदे मुख्यमंत्री असताना हा महामार्ग रद्द करू, आरेखनात बदल करू अशी आश्वासने ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांना दिले होते. त्यामुळे शिंदे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.

राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने काम सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करा त्यासाठीच्या प्रक्रीया तातडीने सुरू करा, असे निर्देश दिले.

‘समृद्धीचा अंतिम टप्पा फेब्रुवारीअखेर खुला करा’

फडणवीस पुढे म्हणाले, ‘समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणे पर्यंतचे ७६ कि.मी. लांबीचे काम तातडीने पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्ज रोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे काम ही गतीने पूर्णत्वास न्यावे. त्याचप्रमाणे नाशिक -मुंबई या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे सुधारणा करण्याचे काम ही तातडीने पूर्ण करावे. तसेच मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरुवात येत्या १०० दिवसांत करण्याचे सूचित केले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘झाडे लावताना दक्षता घ्या’

रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात यावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT