Jain Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Jain Irrigation : जैन हिल्सवरील ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ला चांगला प्रतिसाद

Indian agriculture : जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या ‘ जयंतीनिमित्त’ ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषी महोत्सवाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स ली.तर्फे जैन हिल्सवरील कृषी संशोधन व विकास केंद्रात 10 डिसेंबर पासून करण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या ‘ जयंतीनिमित्त’ ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषी महोत्सवाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स ली.तर्फे जैन हिल्सवरील कृषी संशोधन व विकास केंद्रात 10 डिसेंबर पासून करण्यात आले आहे.

या महोत्सवास आतापर्यंत राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, हिमाचलप्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेशसह विविध भागातील हजारो शेतकरी, कृषी तज्ज्ञ, अभ्यासक आदींनी भेट दिली आहे. या मंडळीने शेतीतील आधुनिक, नवे तंत्रज्ञान अभ्यासले असून, हा महोत्सव शेती, शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. कृषी महोत्सव पुढे १४ जानेवारी २०२४ पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.

अल्ट्राहायडेन्सीटीच्या फळबागा, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज, रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आल्याचे आंतरपीक, ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन याबाबत शेतकऱ्यांनी माहिती घेऊन आपले चांगले, सकारात्मक अभिप्राय दिले आहेत. तसेच शेती अवजारे, कांदा लागवड यंत्र हेदेखील आकर्षण ठरत आहे.

करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पिकाची शेती याची माहिती शेतकऱ्यांना तज्ज्ञ देत आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जैन हिल्स येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यांचे आहे आकर्षण

ऊसाची आधुनिक लागवड, उसाचे विविध वाण, उतिसंवर्धित पपई रोपे, मसाला पिके यांचेही महोत्सवात आकर्षण आहे. यासह फ्लॅटबेड, राईसबेड आणि मल्चिंगचा उपयोग करून वाढविले कापूस पिकही शेतकऱ्यांच्या पसंतील उरले आहे.

केळीच्या विविध जाती

केळीबाबत या महेत्सवात मोठी माहिती आहे. त्यात. केळीच्या इल्लाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या वाणांचे प्रात्यक्षिक क्षेत्र आहे. बागा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी किंवा अभ्यासण्यासाठी कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.

केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, ३० फूट उंच केळी बाग आदी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी यात अभ्यासले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT