Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Bharpai: खूशखबर, शेतकऱ्यांना २५५५ कोटी विमा भरपाईचा मार्ग अखेर मोकळा; मागच्या हंगामांमधील प्रलंबित भरपाईही मिळणार

Farmer Insurance Payout: राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी २५५५ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केली आहे. यामध्ये २०२२-२०२४ हंगामांच्या प्रलंबित भरपाईसह नवीन भरपाईचा समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: शेतकरी खरिप हंगाम २०२४ मधील भरपाईची वाट पाहत होते. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती. सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिलाच शिवाय खरिप २०२२ पासून रखडेलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधीही दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरिप आणि रब्बी २०२२-२३, खरिप २०२३ तसेच रब्बी २०२३-२४ आणि खरिप २०२४ मधील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या सर्व हंगामातील एकूण २ हजार ५५५ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील भरपाईची कोणत्याच प्रकारची भरपाई मिळालेली नव्हती. शिवाय खरिप हंगाम २०२२ आणि रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिकची भरपाई देण्यासाठी राज्याकडे रक्कम शिल्लक होती. तसेच खरिप खरिप हंगाम २०२३ आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मधील ११० टक्क्यांपेक्षा अधिक भरपाईची रक्कम आणि खरिप २०२४ मधील शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता आणि राज्य सरकारचा विमा हप्ता राज्य सरकारने दिलेला नव्हता. तसेच रब्बी हंगाम २०२४-२५ मधील शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता आणि राज्याचा विमा हप्ताही कंपन्यांना दिला नव्हता. त्यामुळे या सर्व हंगामात देय असलेली विमा भरपाईची रक्कम रखडली होती. ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलनेही केली. c

राज्य सरकारने अखेर २०२२ पासून रखडलेल्या विमा भरपाईचा मुद्दा निकाली काढला. खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३, खरिप २०२३ आणि रब्बी हंगाम २०२३-२४, खरिप २०२४ तसेच रब्बी २०२४-२५ या सर्व हंगामातील प्रलंबित भरपाईसाठी राज्य शासनाला विमा कंपन्यांना एकूण २ हजार ८५२ कोटी रुपये राज्य हिस्सा अनुदान देणे आवश्यक होते. राज्य सरकारने आता विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना ही रक्कम मिळून लवकरच शेतकऱ्यांनाही विमा भरपाई मिळणार आहे. 

किती भरपाई मिळणार?

शेतकऱ्यांना खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३, खरिप २०२३ आणि रब्बी हंगाम २०२३-२४, खरिप २०२४ या हंगामातील भरपाईपोटी एकूण २ हजार ५५५ कोटी रुपये मिळणार आहेत. ही भरपाईची रक्कम ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

कोणत्या हंगामासाठी किती भरपाई मिळणार ?

राज्य सरकारने विमा कंपन्यांना पाठीमागील हंगामातील प्रलंबित विमा हप्ता अनुदानही दिले. त्यामुळे मागील विविध हंगामातील भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

खरिप आणि रब्बी २०२२-२३

खरिप हंगाम २०२२ आणि रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी ११० टक्क्यांपेक्षा जास्त विमा भरपाई निश्चित केली होती. पण ८०:११० च्या सुत्रानुसार ११० टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई शासनाने द्यायची आहे. त्यामुळे या दोन्ही हंगामातील २ कोटी ८७ लाख रुपयांची भरपाई शासनाच्या अनुदानामुळे रखडली होती. आता शासनाने ही रक्कम विमा कंपन्यांना मंजूर केली आहे. त्यामुळे खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ मधील २ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

खरिप २०२३

खरिप हंगाम २०२३ मध्ये काही जिल्ह्यांमध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिक भरपाई कंपन्यांनी निश्चित केली होती. मात्र राज्य सरकारने ११० टक्क्यांपेक्षा अधिक निश्चित १८१ कोटींची भरपाईची रक्कम कंपन्यांना दिली नाही. त्यामुळे ही भरपाई रखडली होती. मात्र आता सरकारने हा निधी मंजूर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिप २०२३ मधील १८१ कोटींची भरपाई देखील लगेच मिळणार आहे.

रब्बी २०२३-२४

रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिकची ६३ कोटी रुपयांची भरपाई कंपन्यांनी निश्चित केली होती. पण राज्याने ही भरपाई न दिल्याने रखडली होती. पण आता राज्याने हा निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना ६३ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

खरिप हंगाम २०२४

खरिप हंगाम २०२४ मधील भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकरी भरपाईची वाट पाहत होते. शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगर अंतर्गत एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पण राज्याने आपला विमा हप्ता दिला नसल्याने भरपाई रखडली होती. मात्र आता राज्याने विमा हप्ता कंपन्यांना दिला. त्यामुळे खरिप हंगाम २०२४ साठी शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT