Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Limit : अहिल्यानगर जिल्हा बॅंकेकडून पीककर्ज मर्यादेत एकरी दहा हजारांची वाढ

Ahilyanagar DCC Bank : अहिल्यानगर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बाजरी, ज्वारीच्या पीककर्ज मर्यादेत एकरी दहा हजाराने वाढ केली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बाजरी, ज्वारीच्या पीककर्ज मर्यादेत एकरी दहा हजाराने वाढ केली आहे. त्यामुळे आता ज्वारी, बाजरी या भुसार पिकांसाठी एकरी चाळीस हजार रुपयांचे पीक कर्ज मिळेल. नव्या वर्षात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

अहिल्यानगर येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सातत्याने शेतकरी हिताचे वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. खरिपात तसेच रब्बीत ज्वारी, बाजरी या भुसार पिकांना पीककर्ज देताना एकरी ३० हजार रुपयांचा मर्यादेत पीककर्ज दिले जात होते.

त्यात वाढ करावी, अशी मागणी होत असल्याने बुधवारी (ता. २६) झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये २०२५-२६ करिता खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकासाठी दहा हजार रुपयांनी एकरी कर्जमर्यादेत वाढ केल्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी पिकांसाठी एकरी चाळीस हजारांचे कर्ज मिळणार असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत अल्पमुदत पीककर्जाकरिता २४२१ कोटींचे कर्जवाटप केलेले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ३१ मार्च २०२५ अखेर असलेल्या वसुलास पात्र पीककर्ज रकमेचा वेळेत भरणा करून शासनाच्या व्याज परतावा धोरणाचा फायदा घेऊन तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जास शून्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज 

Farm Loan Waiver: कर्जमाफीबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण नियमित कर्जदारांनाही दिलासा मिळावा- अजित नवले

Power Theft Cases: तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्या पकडल्या

Pending Works: प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : खासदार डॉ. कल्याण काळे

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT