Gold Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Gold Rate : सोने पुन्हा चकाकले

Gold Market : दर विनाजीएसटी ७१ हजार ६५० रुपये तोळा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः सोने दरात या आठवड्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. दर विनाजीएसटी ७१ हजार ६५० रुपये प्रतितोळा, असे येथील सराफा बाजारात पोहोचले आहेत. चांदी दरही विनाजीएसटी ८३ हजार रुपये प्रतिकिलो, असे आहेत.

सोने दरात मागील सात ते आठ दिवसांत एक तोळ्यामागे १८०० रुपयांची घसरण झाली होती. तसेच चांदी दरातही एक किलोमागे तीन हजार रुपये घसरण झाली होती. २० एप्रिल रोजी सोने दर विनाजीएसटी ७६ हजार १४ रुपये प्रतितोळा, असा होता. तर चांदी दर विक्रमी स्थितीत म्हणजेच ८६ हजार ५२० रुपये प्रतिकिलो (विनाजीएसटी) असे होते.

गुढीपाडव्याला सोने दर प्रतितोळा ७४ हजार ३६६ रुपये असे होते. परंतु त्यात वाढ होत गेली. परंतु नंतर सोने व चांदी दरात नरमाईदेखील आली. सोने व चांदी दर ऐन लग्नसराईच्या काळात वधारले. यामुळे ग्राहकांना फटका बसला. परंतु त्यात नरमाई आल्याने ग्राहकांना दिलासाही मिळाला होता. आता अक्षय तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर सोने दरात एक तोळ्यामागे ४५० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दरात एक किलोमागे दोन हजारांची वाढ झाली आहे.


मोठ्या गुंतवणूकदारांकडून खरेदी
सोने खरेदीबाबत ग्रामीण भागातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. परंतु चाकरमानी, मोठे गुंतवणूकदार सोने खरेदी करीत आहेत. लग्नसराईमुळेदेखील येथील सराफा बाजारात उलाढाल बरी आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा भाव दबावात; सोयाबीन स्थिरावले, संत्रा आवक टिकून, गहू नरमला तर डाळिंबाला उठाव

Leopard Attack: बागलाणात बिबट्याच्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार

Milk Adulteration: दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती

Crop Loan: पीक कर्ज भरण्याची तारीख ३१ मार्च ऐवजी ३० जून करा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Pre Monsoon Rain: आजपासून ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT