Gokul Milk agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk : गोकुळच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, अध्यक्षांकडून ५ हजार रूपये पगारवाढीची घोषणा

Gokul Milk Worker : गोकुळ दूध संघ व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये कर्मचारी वेतनवाढ त्रैवार्षिक कराराची बैठक झाली.

sandeep Shirguppe

Gokul Milk Kolhapur : गोकुळ दूध संघ व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये कर्मचारी वेतनवाढ त्रैवार्षिक कराराची बैठक झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी पाच हजार रुपये पगारवाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली.

दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेतनवाढीची घोषणा करण्यात आली.

ही वेतनवाढ ३० जून २०२३ पासून कायम असणाऱ्या १९९४ कर्मचाऱ्यांना लागू होणार असून, वार्षिक ११ कोटी १६ लाख ४० हजार रुपये रक्कम होणार आहे. वेतनवाढ करून संघाने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रा. किसन चौगले, बाळासाहेब खाडे, संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील, संजय दलगेकर, सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पुणेकर, बोर्ड सचिव प्रदीप पाटील, सहायक महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक ए. एन. जोशी, रामकृष्ण पाटील, डॉ. उदय मोगले, दत्तात्रय पाटील, बी. आर. पाटील, बाजीराव राणे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT