Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : सर्व प्रश्नांची उत्तरे देणार गोकुळ अध्यक्ष अरूण डोंगळेंचा शब्द, शौमिका महाडिक काय घेणार भूमिका?

Shoumika Mahadik : गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाडिक गटाकडून गोकुळच्या प्रत्येक कारभारावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.

sandeep Shirguppe

Gokul Milk Kolhapur : गोकुळकडे गायीचे दूध अतिरिक्त ठरत आहे, तरीही दूध उत्पादकांना गाय दुधासाठी इतर संघांपेक्षा जास्त दर दिला आहे. त्यामुळे गोकुळ १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करू शकला आहे. शुक्रवारी (ता. ३०) होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सभेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संपर्क सभा घेऊन ज्या-त्या उत्पादकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली आहे, तरीही सर्वसाधारण सभेत आलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही बांधिल असणार असल्याचे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी सांगितले.

‘गोकुळ’च्या माध्यमातून दोन हजार ३७४ म्हैस खरेदी केली आहे. त्या प्रत्येकी म्हशीसाठी ४० हजार रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये उत्पादकांना एकूण नऊ कोटी ४९ लाख ६० हजार रुपये दूध फायदा होणार आहे, तर गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर सरासरी ३३ रुपये दर देऊन राज्यातील इतर संघांच्या तुलनेत गेल्या आठ महिन्यांत गोकुळ दूध उत्पादकांना ९३ कोटी ६० लाख रुपये जादा दिल्याचे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.

डोंगळे म्हणाले, ‘‘गोकुळची वार्षिक दूध संकलनामध्ये प्रतिदिनी सरासरी अडीच लाख लिटर दूध वाढ झाली आहे. १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला वर्षात तब्बल २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा केला आहे. कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेअतंर्गत २० कोटी २५ लाख अनुदान सिस्टीमा बायो, एन.डी.डी.बीकडून दूध उत्पादकांना दिले असल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.

"सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे नवीन सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाच्या वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे सहा कोटी ५० लाख रुपयांची बचत होणार आहे. म्हैस दूध वाढीसाठी जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ३० हजार ऐवजी ४० हजार रुपये केले आहेत. नव्या अनुदान धोरणानुसार जिल्ह्यात दोन हजार ३७४ म्हैशी खरेदी केल्या आहेत. याचा म्हैस दूध उत्पादकांना फायदा होणार असल्याचे डोंगळे म्हणाले’’

वर्षाला १० कोटींपेक्षा जास्त रक्कम

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाशी सलंग्न असणाऱ्या दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर रकमेत प्रतिलिटर पाच पैसे वाढ केल्यामुळे वर्षाला १० ते ११ कोटी रुपये दिले जात आहेत.

महाडिक गट काय करणार याकडे लक्ष

गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाडिक गटाकडून गोकुळच्या प्रत्येक कारभारावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. दरम्यान यातून गोकुळच्या उद्या होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेत विविध मुद्दांवरून वाद संचालिका शौमिका महाडिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT