Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : सहकाराचं सत्ता केंद्र गोकुळ दूध संघ महाडिकांच्या निशाण्यावर, सतेज पाटलांना धक्का बसणार?

Cooperatives Kolhapur Politics : सहकारात पक्षविरहित राजकारण केले जात असले तरी त्यातील नेत्यांना या निवडणुकांमध्ये घ्याव्या लागलेल्या वेगवेगळ्या भूमिका, तसेच बसलेल्या फटक्यामुळे ‘गोकुळ’मधील समीकरणे आकाराला येऊ शकतात.

sandeep Shirguppe

Kolhapur Politics : महाराष्ट्र विधानसभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने एकतर्फी १० जागांवर विजय निश्चित केला. दरम्यान जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर आता महाडिक गटाचा निशाणा असणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची मोट बांधत महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतलेले ‘गोकुळ’ परत मिळवण्यासाठी महाडिक गटाकडून जोरदार प्रयत्न होणार आहे.

महायुतीच्या सत्तेमुळे आगामी कालावधीत जिल्ह्यातील समीकरणे बदलली जाऊ शकतात. सहकारात पक्षविरहित राजकारण केले जात असले तरी त्यातील नेत्यांना या निवडणुकांमध्ये घ्याव्या लागलेल्या वेगवेगळ्या भूमिका, तसेच बसलेल्या फटक्यामुळे ‘गोकुळ’मधील समीकरणे आकाराला येऊ शकतात. जिल्ह्यातील विविध पक्षांतील नेत्यांच्या माध्यमातून जिल्हा दूध संघाचे राजकारण केले गेले.

महाडिक गटाच्या ताब्यातून गोकुळ काढून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक, के. पी. पाटील एकत्र आले. या निवडणुकीत त्यातीलच आमदार सतेज पाटील आणि के. पी. पाटील हे आघाडीकडून, तर आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक, विनय कोरे हे युतीकडून होते.

‘गोकुळ’चे नेतृत्व करणारे आमदार सतेज पाटील यांनी आमदार आबिटकरांच्या विरोधातील के. पी. पाटील यांना मदत केली. त्यांच्या विजयाची जबाबदारीही देण्यात आली होती. कोरे यांनी यापूर्वीच राजाराम कारखान्याच्या राजकारणात महाडिक यांच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली. तर माजी खासदार संजय मंडलिक यांना ‘गोकुळ’मध्ये मुलीला आणि बहिणीला पाडल्याचा पराभव जिव्हारी लागला आहे. आमदार हसन मुश्रीफ महायुतीत असल्याने त्यांच्याकडून भविष्यात काय भूमिका घेतली जाते. याबाबत संदिग्धता आहे.

विविध समीकरणे येणार आकाराला

‘गोकुळ’च्या निवडणुकीला अजून अवधी आहे, पण राज्यातील सत्तेनंतर महाडिक गटाकडून निश्‍चितच ‘गोकुळ’ परत मिळवण्याची तयारी केली जाईल, यात शंका नाही. सर्वसाधारण सभा, तसेच विविध निर्णयांवर महाडिक गटाकडून घेतल्या जात असलेल्या कडक भूमिकेतूनच त्याची प्रचिती येत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यात विविध समीकरणे आकाराला येणार असल्याने ‘गोकुळ’ समोर ठेवून वाटचाल केली जाऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT