Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रूपयांची वाढ; मंत्री हसन मुश्रीफांकडून घोषणा

Gokul Dudh Sangh Kolhapur : म्हैस दूध संकलन २० लाख करण्याचा संकल्प होता तो १९ लाखांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या म्हशीच्या दुधाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथे दुधाची मागणी वाढत आहे.

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh Increases Cow Milk : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) १ एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात दोन रूपयांनी वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तसेच आगामी काळात म्हशीचे २५ लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्धिष्ट असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. तसेच आमदार सतेज पाटील यांनीही १० गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना म्हशींसाठी कर्ज पुरवठा करणार असल्याचे सांगितले. गुढीपाडव्यानिमीत्त गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी प्रारंभ कार्यक्रमात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील बोलत होते.

गोकुळ दूध संघाच्या गाय दूध खरेदी तसेच म्हशीचे दूध संकलन वाढ आणि गोकुळच्या पुढील वाटचालीवर मंत्री मुश्रीफ म्हणाले की, "कोल्हापूर जिल्हा दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असून दूध संकलन वाढवण्यावर भर द्यावा. तसेच म्हैस दूध संकलन २० लाख करण्याचा संकल्प होता तो १९ लाखांपर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील म्हशींच्या दुधाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथे दुधाची मागणी वाढत आहे. त्यासाठी येथे लवकरच दोन नवीन युनिट उभारावी लागणार आहेत". असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

"२५ लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर सभासदांनी म्हशींची संख्या वाढविली पाहिजे. गोकुळचे पाच लाख सभासद आहेत. त्यातील दोन लाख सभासदांनी प्रत्येकी एक म्हैस खरेदी केली तर आपण २५ लाखांचा टप्पा पूर्ण होऊ शकतो. यासाठी जिल्हा बँकेतून कर्ज देण्याची व्यवस्था केली जाईल". असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

१० गुंठे जमीन असणाऱ्यांनाही म्हशीसाठी कर्ज

आमदार सतेज पाटील म्हणाले, "चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची वाढ केली आहे. गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून दूध उत्पादक हिताचा कारभार करत आहे. गोकुळला मिळणाऱ्या एक रुपया उत्पन्नातील ८५. ६८ पैसे इतका परतावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या संस्था राजकारण विरहित आहेत. यावर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आहे." असे आमदार पाटील म्हणाले.

अमुलच्या बरोबरीसाठी कंबर कसा : खासदार शाहू महाराज

खासदार शाहू महाराज म्हणाले, "गोकुळ दूध संघ हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार संघ आहे. विविध पक्षाचे लोक येथे एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे चित्र आहे. गोकुळचे सहकारातील कार्य चांगले असल्यामुळेच दूध उत्पादकांना दुधाचा दर सातत्याने चांगला मिळत आहे. अमुलची बरोबरी करायची असेल तर कंबर कसावी लागेल. तो मोठा संघ आहे. त्यासाठी दूध संकलनाबरोबरच उत्पादने आणि अन्य व्यवस्थाही उभाराव्या लागतील." असे खासदार शाहू छत्रपती म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT