Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh Kolhapur : 'भेसळयुक्त दूध आल्यास कोणाचीही हयगय नाही', गोकुळ अध्यक्षांचा आक्रमक पावित्रा

Gokul Dudh Sangh Chairman : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांकडून चांगला दूध पुरवठा होतो.

sandeep Shirguppe

Kolhapur Jilha Dudh Sangh : ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांकडून चांगला दूध पुरवठा होतो. काही दूध संस्थांकडून भेसळयुक्त दूध पुरवठा होत असेल तर तो होऊ दिला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या चांगल्या दुधाला जास्त दर देण्याची जबाबदारी जशी आहे, तशीच ग्राहकांना सकस आणि चांगले दूध विक्री करण्याची जबाबदारीही गोकुळची आहे. चुकीच्या पद्धतीने दूध पुरवठा करणारी दूध संस्था कोणाचीही असो असा दूध पुरवठा तत्काळ थांबवला जाईल’, अशी माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज (ता.०५) दिली.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, ‘गोकुळला हजारो संस्था दूध पुरवठा करतात. काही संस्थांमध्ये किरकोळ भेसळयुक्त दूध निघत असेल तर ते बाजूला काढले जाते. ते दूध कोणाच्या संस्थेचे आहे, कोणाच्या नावाने आहे, हे पाहिले जात नाही. जे दूध गोकुळला येते ते दूध संस्थेच्या नावाने नाही तर बारकोडने येत असते.

त्यामुळे मशिनमध्ये याची तपासणी झाल्यानंतर दुधाची गुणवत्ता लक्षात येते. भविष्यातही भेसळसदृश किंवा भेसळयुक्त दूध नाकारले जाईल. त्यामुळे दूध संस्थांनीही आपला संघ म्हणून चांगला दूध पुरवठा करावा, अशी माफक अपेक्षा आहे.

जिल्ह्यात अनेक दूध संस्थांना काही नेत्यांची नावे दिली आहेत. यात चुकीचे काहीही नाही. दरम्यान, ज्या नेत्यांची नावे आहेत, ते नेते कधीही दुधात भेसळ करा म्हणून सांगणार नाहीत. चांगला दूध पुरवठा करून संघाचा नावलौकिक वाढवला पाहिजे, अशी त्या सर्व नेत्यांची भूमिका होती. हे विसरून चालणार नाही.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pig Farming Techniques: शास्त्रीय पद्धतीने वराहपालनाचे जाणून घेतले तंत्र

Government Employees Strike: नागरिकांच्या कामाचा खोळंबा!

Argentina Agriculture: अर्जेंटिनातील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल

Bt Cotton Seeds Rate : २०२६ च्या खरीपसाठी बीटी कपाशी बियाण्यांचे दर 'जैसे थे'; केंद्र सरकारचा निर्णय

ZPFMS Shutdown: झेडपीएफएमएस बंद; वित्तीय व्यवहार ठप्प

SCROLL FOR NEXT