Gokul Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Buffalo Milk Rate : गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ; परिपत्रक जाहीर

Gokul Milk Rate : संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफपासून पुढे ही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

sandeep Shirguppe

Buffalo Milk Gokul Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) म्हैस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शनिवार (ता.११) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफपासून पुढे ही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

याबाबत गोकुळने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे, गोकुळचे सध्या म्हैस दूध संकलन ९ लाख ३० हजार लिटर प्रतिदिन इतके आहे. सध्या म्हैस दुधाची मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी मागणी वाढली आहे. म्हैस दुधाचे उत्पादन जास्त व्हावे यासाठी गोकुळ दूध संघाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या संचालक मंडळाने ६.५ फॅट व ९.० एसएनएफसाठी शेतकऱ्यांना प्रति लीटर ५४.८० रुपये दर मिळणार आहे. कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या दरवाढीचा फायदा होणार आहे. शुक्रवारी (ता.१०) कोल्हापूर जिल्ह्यातील नुतन मंत्र्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी या दरवाढीचे सुतोवाच केले होते.

गाय खरेदी दूध दरात वाढ

राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संस्थांनी नववर्षाच्या स्वागतालाच गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रूपयांची वाढ केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा या दोन दूध संघांनी वाढ केली नाही. ज्या दूध संघांनी दरवाढ केली आहे, त्या दूध संघांकडून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर दिला जाणार आहे. यापूर्वी गोकुळ आणि वारणा दूध संघाने दर वाढवून दिल्याने त्यांनी खरेदी दरात वाढ केली नाही.

फेब्रुवारीनंतर खरेदी दरात वाढ शक्य

फेब्रुवारी महिन्यात दुधाबरोबरच पावडर व बटरची मागणी वाढते. याचा अंदाज घेऊन दूध खरेदी दरात वाढ होते. मागील वर्षभरापासून गाय दूध उत्पादकांचा दरावरून मोठा संघर्ष सुरू आहे. येत्या महिन्याभरात दूध दरात वाढ अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT