Godsakhar Sugar Factory  agrowon
ॲग्रो विशेष

Godsakhar Sugar Factory : गोडसाखर कारखान्यास ३०० कोटींचे अर्थसहाय्य, शेतकऱ्यांसह कामगारांचे पैसे मिळणार

Kolhapur Sugar Factory : कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, या वृत्ताला दुजोरा दिला.

sandeep Shirguppe

Godsakhar Sugar Factory Financial Support : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी आवश्यक ३०० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करण्याचा ठराव करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने झाल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, या वृत्ताला दुजोरा देऊन अर्थसहाय्याला अंतिम स्वरूप आल्यानंतर माहिती देऊ, असे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कारखान्याला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे.

गोडसाखर कारखान्याच्या मशिनरींचे आधुनिकीकरण आणि तोडणी-ओढणी वाहतूकदारांना अॅडव्हान्स देण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने ५५ कोटींवर कर्ज उपलब्ध करून दिले. या निधीतून कारखान्याची कामे करून यंदा त्याची चाके सुरू करण्यात अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाला यश आले.

कामे लवकर आवरली नसल्याने कारखाना उशिरा सुरू झाला. परिणामी, यावर्षी गाळप कमी झाले असले तरी पुढील वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. आगामी २५ वर्षे काहीही करायला लागणार नाही, अशा पद्धतीने मशिनरींची कामे केल्याचेही डॉ. शहापूरकर यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

दरम्यान, कारखान्याची गाळप आणि अर्कशाळेची क्षमता वाढविणे, आधुनिकीकरण करणे, इथेनॉल प्रकल्प उभारणे यासाठी साधारण गोडसाखरला ३०० कोटींहून अधिक निधीची गरज आहे. त्याचा डीपीआरसुद्धा (प्रकल्प अहवाल) तयार आहे. तो जिल्हा बँकेलाही दिला आहे.

अद्याप त्यासाठीच्या अर्थसहाय्यावर निर्णय झाला नसल्याने विविध वित्तीय संस्था, बँका, वित्तीय कंपन्या किंवा ट्रस्टकडून निधी उपलब्ध करण्याचा विषय २९ मार्चला झालेल्या बैठकीसमोर होता.

त्यात याबाबतची चर्चाही झाली. सर्वानुमते हा निर्णय व्हावा यासाठी आजच्या संचालक मंडळ बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्याचा विषय आल्यानंतर डॉ. शहापूरकर यांनी एका ट्रस्टतर्फे ३०० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याचे सांगून बैठकीत अर्थसहाय्य देण्याबाबत संबंधित ट्रस्टचे सकारात्मक पत्रही सादर केल्याचे सांगण्यात येते.

यासंदर्भात काही संचालकांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना डॉ. शहापूरकर यांनी विश्वासपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर हा विषय एकमताने मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

ऊस बिलेसुद्धा लवकरच

दरम्यान संचालक मंडळाच्या बैठकीत जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यासाठी सामूहिक सहीचा ठराव व हमीपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्जातून उत्पादकांच्या थकीत ऊस बिलासह तोडणी-ओढणीची देणी लवकरच भागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT