Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Variety : तूर उत्पादनवाढीसाठी गोदावरी वाण उत्तम

Tur Production : तुरीसाठी शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाचा प्राधान्याने विचार करावा, उत्पादनवाढीसाठी हे वाण उपयुक्त आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले.

Team Agrowon

Solapur News : तुरीसाठी शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाचा प्राधान्याने विचार करावा, उत्पादनवाढीसाठी हे वाण उपयुक्त आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले.

शबरी कृषी प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या हिरज प्रक्षेत्रावर अनुसूचित जमाती उपयोजन कार्यक्रमाअंतर्गत जागतिक मृदा दिन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याच वेळी शिवारफेरीही काढण्यात आली. त्या वेळी भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. प्रमुख वक्ते म्हणून मृदा शास्त्रज्ञ विद्यासागर कोळी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राने प्रक्षेत्रावर राबवलेले प्लॅाट उत्तम आहेत. त्यातून पुढे बीजोत्पादनाचे प्लॉटही होऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी ते उत्तम पद्धतीने जोपासले पाहिजेत. भविष्यात गोदावरी वाणाचे बियाणे सर्वांनी वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न कायम राहतील. हिरज प्रक्षेत्रावरील शीवारफेरीचा उद्‌देश होता की शेतकरी बांधवानी तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतामध्ये वाढवावा.

मानवी आरोग्या प्रमाणेच जमिनीचे आरोग्य जपा, ती आपणास भरभरून देईल. रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा, असे सांगितले. प्रास्ताविकात केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. तांबडे यांनी, शेतकरी बांधवानी जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले.

मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप

काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी बसु बिराजदार, सुर्डी येथील शेतकरी महिला गट, पुरस्कार प्राप्त प्रतीक झिने, गणेश राठोड, अमोल काकडे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तांत्रिक मार्गदर्शन अन् शिवारफेरी

तांत्रिक विषयावर बोलताना प्रमुख वक्ते विद्यासागर कोळी यांनी, सेंद्रिय शेतीमध्ये रोपांचा वापर करताना नवीन रूट स्टॉक वर वाढविलेल्या भाजीपाला व फळांच्या रोपांचा वापर वाढवण्यासाठी आवाहन केले. तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकातील कीड व रोगांचा प्रसार थांबविता येत असल्याचे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. या वेळी खास शिवारफेरी काढण्यता आली. त्यामध्ये तुरीच्या गोदावरी, भिमा वाण, नैसर्गिक पद्धतीने आंबा लागवड आदी क्षेत्राला भेट देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Hoarding: खतांच्या साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई; पुणे विभागात ७ विक्रेत्यांवर गुन्हे

Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme: कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तीन समित्यांची स्थापना

Farmer Loan Waiver: कर्जमाफी फसवी, दुष्काळ जाहीर करा; महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

Agriculture Department Cadre Structure: आकृतिबंध सर्व संवर्गांचे हित साधणारा: कृषी आयुक्त सूरज मांढरे

Agri Irrigation Crisis: पिके वाचवायची कशी? ‘उपसाबंदी’मुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट

SCROLL FOR NEXT