Mansoon Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हिमनद्यांवर मॉन्सून परिवर्तनशीलतेचा परिणाम

Monsoon Variability : हिमनद्यांच्या महापुरासाठी जागतिक तापमानवाढ नव्हे, तर मॉन्सूनची नैसर्गिक परिवर्तनशीलता (व्हेरिॲबिलिटी) कारणीभूत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे.

सम्राट कदम

Pune News : हिमनद्यांच्या महापुरासाठी जागतिक तापमानवाढ नव्हे, तर मॉन्सूनची नैसर्गिक परिवर्तनशीलता (व्हेरिॲबिलिटी) कारणीभूत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे. दक्षिण कोरियातील पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. पूर्ण करणारे डॉ. प्रतीक कड संशोधनाबद्दल म्हणाले,

‘‘एका बाजूला जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनग वितळत आहेत. त्यामुळे आलेल्या पुराचा फटका काझीरंगा किंवा पूर्वांचलातील जीवसृष्टीला बसत आहे, असा एक समज होता. मागील काही वर्षांत हिमालयाच्या पूर्वेकडील व ईशान्य भारतात मॉन्सूनचा कल कमी झाला आहे.

मात्र, आम्ही केलेल्या संशोधनात हवामान बदलापेक्षा मॉन्सूनमधील परिवर्तनशीलता सर्वाधिक कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. हिमालयात एक प्रकारचे नैसर्गिक चक्र असून, मॉन्सूनची कोरडी आणि ओली वर्षे तेथे पाहायला मिळतात.’’

..असे झाले संशोधन

१९७९ ते २०२१ या ४३ वर्षांच्या हिमालयातील हवामानाचा अभ्यास.

एकापेक्षा अधिक डेटासेटचा विस्तृत विश्‍लेषणासाठी वापर.

पर्जन्यमान आणि नदीतील पाण्याचे विसर्जन यांच्यातील सहसंबंधाचे विश्लेषण.

अधिक पर्जन्यमान आणि कमी पर्जन्यमान यांचा तुलनात्मक अभ्यास.

निष्कर्ष

हिमालयातील नदीच्या विसर्जनात पर्जन्यमानाचा मोठा वाटा आहे. मात्र, हिम वितळण्यामुळे होणारे परिणाम काही अंशी नाकारता येत नाही.

उष्णता व आर्द्रतेपेक्षा (थर्मोडायनामिक्स) वायुमंडलीय गतिशीलतेचा हिमालयीन नद्यांच्या विसर्जनावर सर्वाधिक परिणाम.

नैसर्गिक परिवर्तनशीलता समजून घेतल्यास हिमालयातील पुराचा अंदाज सुधारू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT