Rohit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rohit Pawar : कुकडीच्या डाव्या कालव्याची रब्बीसाठी तीन आवर्तने सोडा

Rabi Irrigation : कर्जत, जामखेड तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी डाव्या कालव्यावरती मतदारसंघातील ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.

Team Agrowon

Nagar News : कर्जत, जामखेड तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी डाव्या कालव्यावरती मतदारसंघातील ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे या बाबतच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी परिसरातील लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाणी नियोजनाबाबत रब्बी व उन्हाळी हंगामासाठीच्या तीन आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठीची विनंती केली.

जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा पुरेसा पाऊस नाही. कर्जत, जामखेड तालुक्यांतील सीना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.

त्यामुळे कुकडी प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठीचे एकूण तीन आवर्तनाचे योग्य नियोजन व्हावे आणि सिना कालव्याच्या योग्य नियोजन करण्यासाठी कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्यात यावे.

जेणेकरून सीना कालव्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करता येईल आणि सीना कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तन सोडावे, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना बैठकीत केली आहे.

दोनही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ओलिताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने तीन आवर्तनाचे योग्य नियोजन करून आवर्तन सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती या वेळी बैठकीत आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून २ आवर्तने सोडण्याचा निर्णय हा मंजूर झाला असून तिसरे आवर्तन सोडण्याबाबत ही अजित पवार सकारात्मक असून येत्या काही महिन्यांत त्याबाबतही बैठक ठेवून निर्णय घेतला जाणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT