Cotton Export Grant Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Export Grant : कापूस उत्पादकांना निर्यात अनुदान द्या : विजय जावंधिया

Vijay Javndhiya : जागतिक बाजारातील तेजीचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मिळावा याकरिता त्यांना निर्यात अनुदान देण्यात यावे, अशी मागणी कापूस प्रश्‍नाचे अभ्यासक तसेच ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे.

Team Agrowon

Nagpur News : जागतिक बाजारपेठेत कापूस तेजीत असून, ७० ते ७२ हजार रुपये प्रति खंडी असा भाव आहे. त्या तुलनेत भारतात ५८ ते ६० हजार रुपये प्रति खंडी असा दर मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जागतिक बाजारातील तेजीचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मिळावा याकरिता त्यांना निर्यात अनुदान देण्यात यावे, अशी मागणी कापूस प्रश्‍नाचे अभ्यासक तसेच ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे.

जावंधिया यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात जागतिक कापूस बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले आहे. ९० ते ९२ सेंट प्रति पाउंड असलेले रुईचे भाव १ डॉलर २ सेंटच्या आसपास पोहोचले आहेत.

या हिशेबाने जागतिक बाजारात प्रति खंडी रुईचे भाव ७० ते ७२ हजार रुपये होतात. दोन वर्षांपूर्वी जागतिक बाजारात १ लाख रुपये खंडी रुईचे भाव होते. ते आज ७० ते ७२ हजार रुपये झाले आहेत. रशिया-युक्रेन तसेच इस्राईल-गाझा युद्धामुळे निर्यात प्रभावित झाली होती. आज वाहतूक खर्च वाढला आहे.

सरकारने ११ टक्‍के आयात कर शून्य केला आहे. भारतातून २०११-१२ मध्ये विक्रमी ८० लाख गाठींची निर्यात झाली. या वर्षीही किमान ४० ते ५० लाख गाठींची निर्यात होऊ शकते. निर्यातीला प्रोत्साहनासाठी केंद्राने कापूस निर्यातीला वाहतूक अनुदानाची मागणी त्यांनी केली.

देशांतर्गत रुई बाजारात ७०,००० ते ७५,००० रुपये खंडी रुईचे भाव टिकून राहतील, अशी व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना ८००० ते ८५०० रुपये प्रति क्‍विंटल भाव देण्याची हमी देता येणार आहे. जगात तेजी असताना देशात ५८०० ते ६० हजार रुपये खंडीचा भाव हा अन्यायकारक आहे.
विजय जावंधिया, शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT