Prakash Raut Agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Shetkari Sanghatana : कृषिप्रधान देशाला कृषिमंत्री द्या

Demand for Swabhimani Shetkari Sanghatana : केंद्रीय कृषिमंत्र्यांची तत्काळ नियुक्‍ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

Team Agrowon

Yavatmal News : राज्यात राम उत्सवाचा इव्हेंट साजरा करणाऱ्या नेतृत्वाला कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कृषिमंत्री देण्याचा मात्र विसर पडल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून हा आरोप करण्यात आला असून उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्या माध्यमातून हे पत्र पाठविण्यात आले आहे. स्वाभिमानीच्या पत्रानुसार, सध्या शेतीक्षेत्रासमोर अनेक आवाहन आहेत. आयात-निर्यात धोरणाचा फटका बसत सोयाबीन, कापसासह सर्वच शेतमालाचे भाव हमीभावाच्या खाली आले आहेत.

पीकविमा कंपन्या मुजोर झाल्याने त्यांच्याकडून भरपाईस टाळाटाळ होत आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. कृषिप्रधान म्हणविल्या जाणाऱ्या भारतात शेतकरी हित समोर ठेवत निर्णय होणे अपेक्षित असताना त्याऐवजी बहुसंख्याक ग्राहकांचा विचार केला जात आहे.

त्यातूनच प्रक्रियाजन्य पदार्थांचे दर वाढू नये याकरीता प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचा फटका शेतमालाला बसत दर दबावात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने अनावश्‍यक हस्तक्षेप कमी करण्याची गरज आहे. शेतकरी अडचणीत असताना त्याचवेळी केंद्रिय कृषिमंत्री पद मात्र रिक्‍त आहे.

परिणामी शेतकऱ्यांची बाजू मांडणारेच कोणी नसल्याने शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या एकंदरीत परिस्थितीचा विचार करता केंद्रीय कृषिमंत्र्यांची तत्काळ नियुक्‍ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT