Rabi Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Irrigation : ‘गिरणा’चे पाणी शेतीला डावलून उद्योगासाठी राखीव

Water Crisis : खानदेशात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या गिरणा नदीवरील चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या गिरणा नदीवरील चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही.

फक्त ५६ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे शेतीला डावलून उद्योगासाठी व टंचाई निवारणार्थ प्रकल्पाचे पाणी राखीव करण्यात आले आहे. यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगावमधील रब्बीला पाणी मिळणार नसल्याची स्थिती आहे.

गिरणा धरणातून २१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी रब्बीत पाणी दिले जात होते. १८ टीएमसी एवढी त्याची साठवण क्षमता आहे. परंतु त्यात यंदा कमी पावसामुळे फक्त ५६ टक्के जलसाठा झाला. यामुळे प्रकल्पातून उद्योग, पिण्याचे पाणी, टंचाई निवारणार्थच आवर्तन दिले जाईल, असा निर्णय नुकताच कालवा सल्लागार समितीने घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

त्यात शेतकरी प्रतिनिधींनी शेतीला पाणी देण्याची मागणी केली. परंतु धरणात जलसाठा अपूर्ण आहे. शिवाय चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, नाशिकमधील मनमाड शहरासही या धरणातून पाणी दिले जाते. तसेच टंचाई निवारणार्थ नदीतही आवर्तन सोडले जाते. यामुळे यंदा रब्बीसाठी पाणी देणे शक्य नसल्याचा मुद्दा पुढे आला.=

चार वेळेस नदीत टंचाई निवारणार्थ पाणी सोडले जाईल. डिसेंबर ते जून या कालावधीत हे पाणी सोडले जाईल, असा निर्णय या समितीच्या बैठकीत झाला. धरणातून मध्यंतरी चाळीसगाव औद्योगिक वसाहतीसाठी जामदा बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यात आले होते. शनिवारीदेखील (ता. ४) या धरणातून १५०० क्सूसेकचा विसर्ग नदीत सोडण्यात आला. जामदा बंधाऱ्यापर्यंत हे पाणी सोडले जाईल.

दुष्काळात तेरावा...

गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळण्याची आशा धूसर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. कारण, चाळीसगाव तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. चाळीसगावातील मन्याड प्रकल्पातही जलसाठा नाही. तसेच पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतही जलसाठा नाही. भोकरबारी प्रकल्पही कोरडाच आहे. यामुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्टा टंचाईचा सामना आतापासूनच करीत आहे. चाळीसगाव भागात जलसाठे आतापासून आटत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT