Agriculture Education Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education : कृषी शिक्षणात मुलींचा बोलबाला ; गुणवत्तेतही सरशी

Girls In Agriculture Education : शेती करणे हे कठीण आहे. परंतु या कृषी विद्यापीठात मुली बहुसंख्येने शिक्षण घेत आहेत याचे कौतुक वाटते. महिलांनी विशेषतः मुलींनी आर्थिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे.

Team Agrowon

Parbhani News : पूर्वी कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी होते. मात्र आता कृषीचे शिक्षण घेणाण्यामध्ये मुलींचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असून गुणवत्तेमध्ये मुली सरस ठरत आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये गुरुवारी (ता. ६) आयोजित विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. इंद्र मणी होते.

या वेळी माजी लेडी गव्हर्नर व अमरावती येथील तक्षशीला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कमलताई गवई, आयएएस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. गजेंद्र लोंढे यांची उपस्थिती होती.

डॉ. गवई म्हणाल्या, की शेती करणे हे कठीण आहे. परंतु या कृषी विद्यापीठात मुली बहुसंख्येने शिक्षण घेत आहेत याचे कौतुक वाटते. महिलांनी विशेषतः मुलींनी आर्थिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे.

डॉ. काठोळे म्हणाले, की शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून समाजामध्ये शेतकरी सहज ओळखू येतो. यामध्ये चांगल्या बदलासाठी कृषी विद्यापीठ कार्य करते याचा अभिमान वाटतो. प्रास्ताविक डॉ. गोदावरी पवार यांनी केले. सूत्रसंचालन सारिका नारळे यांनी केले तर डॉ. फरिया खान यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT