Agriculture GI Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture GI : खजूर गुळासह ओडिशातील आणखी सात उत्पादनांना भौगोलिक मानांकन

GI Rating : ढेंकनाल मगजी हा खाद्यपदार्थ, मयूरभंज येथील काई चटणी, नयागड कांतेमुडी वांगी, कलाजीरा तांदूळ, या उत्पादनांनाही जीआय मानांकन देण्यात आले आहे.

Team Agrowon

Bhuvneshwar News : ओडिशामधील लांजिया सौरा चित्रशैली, डोंगरिया कोंध नक्षीदार शाल आणि खजूर गूळ यांसह ओडिशामधील सात उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले असल्याची माहिती ओडिशा सरकारच्या राज्य अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कल्याण विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. ४) देण्यात आली.

ओडिशातील उत्पादनांना नुकत्याच मिळालेल्या मानांकनासह राज्यातील उत्पादनांना मिळालेल्या ‘जीआय’ची संख्या आता २५ झाली आहे.

या उत्पादनांना ‘जीआय’

ढेंकनाल मगजी हा खाद्यपदार्थ, मयूरभंज येथील काई चटणी, नयागड कांतेमुडी वांगी, कलाजीरा तांदूळ, या उत्पादनांनाही जीआय मानांकन देण्यात आले आहे. लांजिया सौरा ही ओडिशामधील राजगड जिल्ह्यातील ‘पीव्हीटीजी’ आदिवासी समुदायाची खास चित्रशैली आहे.

हा समुदाय प्रामुख्याने त्यांच्या घरांच्या भिंतींवर लाल रंगा आणि पांढऱ्या रंगात ही चित्रे साकारली जातात. त्याचप्रमाणे डोंगरिया कोंध या आदिवासी समाजाच्या महिला खास नक्षी असलेल्या शालींची निर्मिती करतात, येथे आलेल्या पाहुण्यांना या शाली भेट देण्याची पद्धत आहे.

जीआय मानांकन मिळालेला कलाजीरा तांदूळ हा औषधी गुणधर्मांनी युक्त आहे, अशी स्थानिकांची मान्यता आहे. ओडिशात आढळणाऱ्या लाल मुंग्यांपासून तयार करण्यात येणारी काई चटणी ही देखील आरोग्यासाठी चांगली असल्याचा स्थानिकांच्या वतीने दावा करण्यात येतो.

त्याचप्रमाणे जीआय मानांकन मिळालेला खजूर गूळ हा येथील गजपती जिल्ह्यात तयार केला जातो. खजुराच्या झाडापासून या गुळाची निर्मिती केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT