Color Cotton Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Color Cotton Variety : घातखेडा ‘केव्हीके’ देणार रंगीत कापूस वाणाचा पर्याय

Cotton Crop : कापसावर प्रक्रिया करून त्यापासून धागा, कापड आणि त्या कापडावर नंतर रासायनिक प्रक्रिया करून रंग दिला जातो.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : कापसावर प्रक्रिया करून त्यापासून धागा, कापड आणि त्या कापडावर नंतर रासायनिक प्रक्रिया करून रंग दिला जातो. त्वचेसाठी हे रंग हानिकारक ठरत असल्याने नैसर्गिक रंग असलेल्या कापसालाच येत्या काळात मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘केव्हीके घातखेडा’च्या प्रक्षेत्रावर रंगीत कापसाच्या चाचण्यांसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

सेंद्रिय शेतीमाल त्यासोबतच नैसर्गिक रंगाबाबत जागृती वाढली आहे. आरोग्याप्रती संवेदनशीलता वाढल्याने त्याचे हे परिणाम असल्याचे सांगितले जाते. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनेदेखील हीच बाब लक्षात घेत खाकी रंगाच्या नैसर्गिक कापसाचे वाण विकसित केले आहे.

त्यानंतर आता एका खासगी कंपनीने अशा प्रकारच्या तब्बल चार वाणांवर काम चालविले आहे. त्याच्या विविध संशोधन संस्था तसेच खासगी प्रक्षेत्रावर चाचण्या घेतल्या जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील घातखेडा ‘केव्हीके’च्या प्रक्षेत्रावर देखील हे कापसाचे चार वाण लावले आहेत. यंदा पहिल्यांदाच या चार लाइन लावल्या आहेत. त्याची उत्पादकता, या भागातील वातावरणात होणारी वाढ या बाबी अभ्यासल्या जातील.

‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. अतुल कळस्कर म्हणाले, ‘‘दोन ओळींत १० इंच, तर दोन झाडांत तीन फूट या प्रमाणे लागवड अंतर ठेवले आहे. सघन पद्धतीने याची लागवड केल्याने उत्पादकता वाढीचा उद्देश साधता येईल.

रासायनिक पद्धतीने रंगविलेल्या कापडामुळे त्वचेवर परिणाम होतात. परिणामी, सध्या नैसर्गिक रंगीत कापसाला जागतिकस्तरावर मागणी आहे. त्याची दखल घेत ‘केव्हीके’च्या प्रक्षेत्रावर एका खासगी कंपनीच्या चार लाइन लावल्या आहेत. अतिसघन पद्धतीची ही लागवड असून, हंगाम अखेरीस त्याची उत्पादकता व इतर बाबींविषयी कळेल.
- डॉ. अतुल कळस्कर, प्रमुख, ‘केव्हीके’ घातखेडा, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT