Poultry Market Agrowon
ॲग्रो विशेष

Chicken Waste : ब्रॉयलर कोंबडी वेस्टपासून जिलेटीन निर्मिती

Broiler Chicken Waste Gelatin Extraction : विशेष म्हणजे जिलेटीन मिळविण्यासाठी पहिल्यांदाच फूड ग्रेड घटकांचा वापर करण्यात आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : चिकनसाठी ब्रॉयलर कोंबडी कापल्यानंतर तब्बल ३७ टक्‍के वाया जाणारे घटक (वेस्ट) मिळतात. यापासून जिलेटीन निर्मितीसाठी उदगीर येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे जिलेटीन मिळविण्यासाठी पहिल्यांदाच फूड ग्रेड घटकांचा वापर करण्यात आला आहे.

खाद्य पदार्थ, औषधी तसेच सौंदर्य प्रसाधने आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जनावरांची त्वचा, हाडांपासून तयार होणाऱ्या जिलेटीनचा वापर केला जातो. कोंबडी, वराह, जनावरे आणि माशांच्या टाकाऊ घटकांपासून जिलेटीन तयार करतात.

चिकनसाठी कोंबडी कापल्यानंतर केल्यानंतर त्वचा, हाडे आणि पाय हे वाया जाणारे घटक मिळतात. यापासून जिलेटीन तयार करण्यासाठी फूडग्रेड घटकांचा वापर करण्यात ‘माफसू‘मधील तज्ज्ञांना यश आले आहे.

हैदराबाद येथील मांस संशोधन संस्थेचे सहकार्य यासाठी मिळाले आहे. या संशोधनामुळे कोंबडी कटिंग नंतर टाकाऊ घटकांना देखील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. सध्या हैदराबाद परिसरात यावर आधारित एक उद्योग कार्यरत आहे.

कोंबडी त्वचेपासून १० ते १५ टक्के, वराहाच्या त्वचेपासून ४६ टक्के, जनावरांच्या चामड्यापासून २९.४ टक्के, जनावरांच्या हाडांपासून २३.१ टक्के आणि माशांपासून १.५ टक्‍के जिलेटीन मिळते.

...अशी आहे प्रक्रिया

कोंबडी कापल्यानंतर त्वचा, हाडे आणि पाय गोळा करून पाण्याने स्वच्छ केले जातात. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीनुसार अल्कली किंवा आम्लाची प्रक्रिया करून कोलेजन वेगळे करतात. त्यानंतर पुढील प्रक्रियेमध्ये कोलेजनचे जिलेटीनमध्ये रूपांतर केले जाते. तयार जिलेटीनमधील (Gelatin) पाण्याचे प्रमाण कमी करून पावडरमध्ये रूपांतर केले जाते.

मिठाई, जाम, जेली, कँडी यांमध्ये जाडसरपणा आणणे, सॉफ्ट आणि हार्ड कॅप्सुलचे कव्हर, फेस मास्क, सौंदर्य प्रसाधन निर्मिती, फोटो फिल्म, पेंट, डिंक निर्मिती, सर्जरी स्पंज, रक्तस्राव रोखणे, दूध किंवा दही घट्ट करणे, डेअरी उत्पादनात स्थिरता आणणे, मांस रोल्स, हॅम आणि सॉसेज, जैविक पॅकेजिंग, पेय उद्योगामध्ये जिलेटीनचा वापर होतो.
- डॉ. नितीन पाटील, कुलगुरू, माफसू
जिलेटीन निर्मितीमध्ये प्रामुख्याने रसायनांचा वापर होतो. परंतु आम्ही कोंबडी वेस्टपासून जिलेटीन तयार करण्यासाठी पहिल्यांदाच ॲसिटिक ॲसिड या फूड ग्रेड घटकाचा वापर केला. हा घटक खाद्यान्न म्हणून सुरक्षित आहे.
- डॉ. मोहम्मद रजियोद्दीन, सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT