Theft News  Agrowon
ॲग्रो विशेष

Theft News : रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद

Electricity Rohitra : रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या ८ चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे.

Team Agrowon

Pune News : रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या ८ चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून ३४० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व पट्ट्या तसेच पाच लाख रुपये किमतींची वाहने (एक कार व पाच दुचाकी) असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी रमेश ऊर्फ राहुल बाळू पडवळ (वय २७ वर्षे) सुनील ऊर्फ सैराट शिवाजी गावडे (२१ वर्षे, दोघेही रा. निमगाव दावडी, ता. खेड, जि. पुणे), सुनील सुरेश गावडे (वय २३ वर्षे ), रवींद्र सुरेश गावडे (वय २३ वर्षे, दोघेही रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे ) उस्मान बिलाल अब्दुल हरेरा (वय २० वर्षे, रा. भांबोली, ता. खेड) कार्तिक नामदेव पवार (वय- २५ वर्ष, रा. राक्षेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चाकण औद्योगिक वसाहतीत तसेच महाळुंगे, चाकण परिसरात महावितरणने विद्युत रोहित्र उभारले आहेत. त्यातील तांब्याच्या तारा व पट्ट्या चोरीला जात होत्या. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांनी विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. रमेश पडवळ याच्यावर नगर, पुणे जिल्ह्यांत विविध पोलिस ठाण्यात चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुनील ऊर्फ सैराट शिवाजी गावडे याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT