Nitin Gadkari Agrowon
ॲग्रो विशेष

Nitin Gadkari : गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला

District Collector Dr. Kiran Patil : बुलडाण्यातून आलेल्या दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. थोड्याच वेळात मंत्री महोदयांचे पत्र दिव्यांगांना सोपवण्यात आले. तसेच मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नागपूर ः बुलडाण्यातून आलेल्या दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. थोड्याच वेळात मंत्री महोदयांचे पत्र दिव्यांगांना सोपवण्यात आले. तसेच मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला.

खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी सकाळपासूनच मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. कुणी वैयक्तिक तर कुणी प्रशासकीय अडचणींच्या संदर्भात निवेदने दिली. यातच बुलडाण्याहून मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत मिळावी असे निवेदन काहींनी दिले.

त्यानंतर गडकरी यांनी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फोन लावला. त्यांना केंद्र सरकारच्या अॅडीप योजनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे अगदी काही मिनिटांतच मंत्री गडकरी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही गेले.

त्या वेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणीने मंत्री गडकरी यांना नोकरीच्या संदर्भात निवेदन दिले.

त्यावर तातडीने कार्यवाही करून मदत करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय गडकरी यांनी ऐकून घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT