Grape Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : द्राक्षशेतीची भविष्यकालीन वाटचाल महत्त्वाची

Post Monsoon Crop Damage : हवामान बदलांचे धोके आपण रोखू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, गारपीट, मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येत नाही.

Team Agrowon

Nashik News : हवामान बदलांचे धोके आपण रोखू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, गारपीट, मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येत नाही. मात्र त्यातील पर्याय यासह भविष्यातील संधी ओळखून कामकाज केल्यास त्यातील धोके कमी करता येतील. शास्त्रीय पद्धतीने कामकाज महत्त्वपूर्ण ठरेल.

त्यातूनच द्राक्षशेतीची भविष्यकालीन वाटचाल महत्त्वाची राहील, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्फत पंचवार्षिक पुनरवलोकन संघ यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांसाठी धोरण व भविष्यकालीन योजना यांचा आढावा घेतला जातो. या धर्तीवर ही समिती जिल्हा दौऱ्यावर आली होती.

या वेळी समितीचे प्रमुख निवृत्त शास्त्रज्ञ व समितीचे प्रमुख डॉ. पार्थ सारथी, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. सुजय साहा, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे फलोत्पादन विज्ञान विभागाचे माजी अतिरिक्त महासंचालक डॉ. बी. के. पांडे, तमिळनाडू कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. रजंगम, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रकल्प समन्वयक (फळे) डॉ. प्रकाश पाटील आदींचा या समितीत समावेश होता. त्यांनी तीनदिवसीय दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देऊन कामकाज अनुभवले.

नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. या वेळी प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी अरुण मोरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागादार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. ‘द्राक्ष बागांची सद्यःस्थिती व भविष्यकालीन उपाययोजना’ यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

रविवारी (ता. २६) झालेल्या गारपिटीच्या पार्श्‍वभूमीवर नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करून बागेतील संभाव्य रोग नियंत्रण करण्यासाठी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी उपाययोजना व सल्ला शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्याची माहिती डॉ. बॅनर्जी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT