Food Processing Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगाच्या संगोपन केंद्रासाठी अनुदान बंद

Food Processing Subsidy : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून (पीएमएफएमई) आतापर्यंत ७६ नवी संगोपन केंद्रे उभी राहिली आहेत. अन्न प्रक्रियेत नव्यानेच प्रवेश करीत असलेल्या उद्योग व व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या केंद्रांवर देण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News : देशात भाजीपाला व फळभागांचे क्षेत्र वाढत असून, कृषी प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारावर भर देण्याची गरज आहे. मात्र दुसऱ्या बाजूला प्रक्रिया उद्योगांसाठी नवे संगोपन केंद्र (इनक्युबेशन सेंटर) सुरू करण्याची बाब अचानक मागे घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून (पीएमएफएमई) आतापर्यंत ७६ नवी संगोपन केंद्रे उभी राहिली आहेत. अन्न प्रक्रियेत नव्यानेच प्रवेश करीत असलेल्या उद्योग व व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या केंद्रांवर देण्यात आली आहे. केंद्र एका बाजूला अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणारी अनुदान योजना राबवित आहे.

त्याचबरोबर दुसरीकडे या योजनेचा लाभ घेऊ शकणाऱ्या नव्या कंपन्या व प्रकल्पांसाठी संगोपन केंद्रांचे जाळेदेखील देशभर उभे होत असल्याचे पाहून अन्न प्रक्रिया उद्योगातून या दोन्ही उपक्रमांचे स्वागत झाले होते. आता मात्र संगोपन केंद्राच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने अचानक आश्‍चर्यकारकपणे माघार घेतली आहे.

पहिल्या टप्प्यात केंद्राने राज्यात तीन संगोपन केंद्रांसाठी मंजुरी दिली होती. यामुळे प्रतिकेंद्र साडेतीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे. त्यानुसार परभणीमधील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व नागपूरच्या नोगा प्रकल्पांना १०० टक्के अनुदान मिळणार आहे. तर बारामतीमध्ये अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ड्रस्टच्या (एडीटी) माध्यमातून उभारण्यात आलेल्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या अन्न प्रक्रिया संगोपन केंद्राला ५० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले होते.

त्यामुळे राज्यात आणखी नवी संगोपन केंद्रे उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या तयारीत राज्य शासन होते. परंतु केंद्राने अनुदान कक्षेतून हा घटकच वगळून टाकला. त्याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही केंद्राने प्रतिसाद दिला नाही, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल सडतो आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजे. प्रक्रिया उद्योग वाढीसाठी संगोपन केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरते. देशात मोठ्या प्रमाणात अशी केंद्रे उभारणे आवश्यक आहेत. त्यामुळे संगोपन केंद्रांची बाब अनुदानातून वगळण्याच्या भूमिकेचा केंद्र शासनाने फेरविचार करायला हवा.
डॉ. अशोक ढवण, माजी कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
केंद्र सरकारची पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अत्यंत लाभदायक आहे. या योजनाचा विस्तार झाला पाहिजे. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), कर्ज प्रकरण, बाजारपेठेचा अभ्यास अशा किचकट बाबीतून जावे लागते. संगोपन केंद्रे त्यासाठी सल्लागाराची भूमिका बजावतात. त्यामुळे अशी केंद्रे तयार न झाल्यास मूळ योजनेचा विस्तार वेगाने होणार नाही.
- गिरीष चितळे, अध्यक्ष, नॅशनल अॅग्रिकल्चर फूड रिसर्च इस्टिट्यूट (नाफारी) व मंडळ सदस्य, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT