Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : चालू हंगामात एफआरपी एकरकमी देण्यात येणार

Sugarcane Season : शासनाने परवानगी दिल्यास तातडीने प्रतिटन शंभर रुपये अधिक देण्यास आम्ही तयार आहोत. चालूवर्षी १५ ते १६ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : शासनाने परवानगी दिल्यास तातडीने प्रतिटन शंभर रुपये अधिक देण्यास आम्ही तयार आहोत. चालूवर्षी १५ ते १६ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या धोरणानुसार चालू गळीत हंगामात एफआरपीची एकरकमी रक्कम देण्यात येणार आहे.

दत्तने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे, असे प्रतिपादन श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केले. शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर झाली. त्याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते.

कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्वच विषयांना हात उंचावून मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते.

या वेळी उत्तम पाटील-बोरगावकर, पृथ्वीराज यादव, व्हाइस चेअरमन शरदचंद्र फाटक, संचालक अनिलराव यादव, इंद्रजीत पाटील, अ‍ॅड. प्रमोद पाटील, विनया घोरपडे, अस्मिता पाटील यांच्यासह सर्व संचालक सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, यांच्यासह सर्व अधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरोळ दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत थांबले होते. शिवाय भरसभेत चालूवर्षी ४ हजार रुपये प्रतिटन दर द्यावा, यासह विविध मागण्या त्यांनी मांडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Rate: ऊसदरावर तोडगा नाही, पहिली उचल ४,५०० रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी

Stress in Turmeric Crop: दुष्काळाचा हळद पिकाला फटका; फुटवे वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाचवण्यासाठी काय कराल?

Sugar Workers Strike : कामगारांच्या हक्कासाठी 'सीटू' मैदानात; साखर कामगारांच्या संपाला बळ

Manual Sugarcane Harvesting: धाराशिवमध्ये ७० टक्के उसाची मजुरांमार्फत तोडणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Drought Crisis : दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाण्याचे चोख नियोजन करा: एस. कार्तिकेयन

SCROLL FOR NEXT