Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : चालू हंगामातील १९३ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ थकली

Sugarcane Season : सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील डिसेंबरअखेर १४ कारखान्यांनी शंभर टक्के ‘एफआरपी’ दिली असून, २० कारखान्यांकडे १९२.७३ कोटी रुपये एफआरपी थकित आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील डिसेंबरअखेर १४ कारखान्यांनी शंभर टक्के ‘एफआरपी’ दिली असून, २० कारखान्यांकडे १९२.७३ कोटी रुपये एफआरपी थकित आहे. नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ७३ कोटी रुपये एफआरपी थकित होती. महिनाभरात त्यामध्ये १२० कोटींनी वाढ झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ३४ कारखान्यांनी ५४ लाख ४७ हजार ३८८ टन उसाचे गाळप केले. कारखान्यांनी त्याचे एक हजार १९१ कोटी रुपये शेतकऱ्यांना ऊसबिलाच्या स्वरूपात दिले आहेत. १४ कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीप्रमाणे १०० टक्के एफआरपी दिली आहे.

नोव्हेंबरअखेर ११ कारखान्यांकडे ७३ कोटी रुपये एफआरपीची थकबाकी होती. उसाचा पहिल्या हप्त्याची स्पर्धा करताना नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसाची २३ कारखान्यांनी शंभर टक्के बिले दिली होती. आता निम्मा हंगाम संपला आहे. हंगाम जसजसा पुढे सरकत चालला आहे, तसतशी थकित एफआरपीची रक्कम मात्र वाढत चालल्याचे आकडेवारीवरून दिसते.

एफआरपीची थकबाकी असलेले कारखाने

कारखाना दिलेली एफआरपी थकित

(कोटी) (कोटी)

सिद्धेश्‍वर २३.८० १५.२२

संत दामाजी २३.१४ ९.३२

संत कुर्मदास ७.८० १०.८८

लोकनेते १४.३२ २८.९४

सासवड ३४.३१ १.४३

लोकमंगल

बिबीदारफळ ६.८९ २.८८

सिद्धनाथ २८.५८ ०.२६

लोकमंगल

भंडारकवठे २७.२९ १०.६७

जकराया १७.०४ ८.०६

इन्द्रेश्‍वर १०.७२ ८.०२

भैरवनाथ, विहाळ ३० ७.७४

भैरवनाथ, लवंगी १६.०० १३.९०

युटोपियन २८.४९ ९.१४

भैरवनाथ, आलेगाव ५.४९ ८.२६

बबनरावजी शिंदे ६३.३१ १४.०८

व्हीपी शुगर्स २२.९१ १०.६१

आष्टी शुगर १२.३१ १.०९

धाराशिव, सांगोला १३.२८ ५.०८

आवताडे शुगर्स २८.०८ ७.८०

विठ्ठल, वेणूनगर ५९.०८ १९.३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT