Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : राजापूरमधून आंबा पेटी अहमदाबादला रवाना

Mango Market : हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये अपेक्षित थंडीचे वातावरण नव्हते. त्यातून, सुरुवातीला आंब्याच्या मोहराचे प्रमाण कमी दिसत होते.

Team Agrowon

Ratnagiri News : तालुक्यातील भू येथील युवा आंबा बागायतदार विशाल सरफरे यांच्या बागेमध्ये तयार झालेल्या हापूसच्या दोन पेट्या मंगळवारी (ता. ३०) विक्रीसाठी मुंबई आणि गुजरात येथील अहमदाबाद येथे रवाना झाल्या.

हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये अपेक्षित थंडीचे वातावरण नव्हते. त्यातून, सुरुवातीला आंब्याच्या मोहराचे प्रमाण कमी दिसत होते. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला थंडीचे चांगले प्रमाण राहिल्याने मोहर आणि फळधारणा चांगली झाली. पुढे अवकाळी पावसाचा आंबा हंगामाला तडाखा बसला आणि फळगळती झाली.

सध्या बागांमध्ये हापूस परिपक्व झाला असून विक्रीसाठी तोडणीही सुरू झाली आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ अहमदाबाद येथील बाजारपेठत तोडणी केलेला हापूस विक्रीसाठी पाठवला जात आहे. आंबा बागायतदार विशाल सरफरे म्हणाले, की हंगामाच्या सुरुवातीला थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने मोहर आणि त्यानंतर फळधारणा कमी राहिली.

त्यानंतर अवकाळी पावसामध्ये फळगळती होऊन बुरशीचाही प्रादुर्भाव झाला. त्यावर बुरशीनाशक औषध फवारणी आणि अन्य उपायोजना वेळोवेळी केल्यानंतर समाधानकारक आंबा तयार झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी किंचित फळाचा आकार (साईज) थोडा मोठा आहे. बाजारपेठेत जानेवारीमध्ये गेलेल्या पहिल्या आंब्याच्या पेटीला निश्‍चितच चांगला भाव (दर) मिळेल याचे समाधान वाटत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT