Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : ‘दारणा’, ‘मुकणे’मधून जायकवाडीसाठी विसर्ग सुरूच

Nashik Water Storage : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहामधून जायकवाडीसाठी ३.१४३ टीएमसी पाणी दिले जाणार आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहामधून जायकवाडीसाठी ३.१४३ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून नियोजन करून गंगापूर, मुकणे व कडवा धरण समूहातून शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून सोमवारपर्यंत (ता. २७) टप्प्याटप्प्याने विसर्ग सोडण्यात येत होता. सुरुवातीला अत्यंत कमी विसर्ग होता. मात्र पुढे त्यात वाढ करून तो नियोजनानुसार कमीअधिक करण्यात आला.

कडवा धरणातून ३०२ दलघफू पाणी सोडण्याचा कोटा पूर्ण झाल्याने सोमवारी (ता. २७) दुपारी ४ वाजता विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर धरणातून ३५० दलघफू पाणी सोडण्याचा कोटा पूर्ण झाल्याने मंगळवारी (ता. २८) सकाळी ६ वाजता बंद करण्यात आला.

या चारही धरणांचे पाणी एकत्र नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी गोदावरीमध्ये सोडले जात आहे. त्यात दारणा धरणातून सर्वाधिक विसर्ग सुरू आहे. सुरुवातीला शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री दारणा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सोडण्यात आला.

त्यानंतर गंगापूर, कडवा व मुकणे या धरणांतून विसर्ग सोडण्यात आला. हे नियोजन करताना त्यात सातत्याने बदल करण्यात आल्याचे दिसून आले. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रविवारी (ता. २६) रात्री ८ वाजता ३,२२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. रात्री ९ वाजता आणखी ६,२३७ क्युसेकने वाढवून एकूण ९,४६५ क्युसेक करण्यात आला.

सोमवारी (ता. २७) सकाळी ६ वाजता ९,४६५ क्युसेक होता. तो पुढील एक तासानंतर ७ वाजता आणखी ७,३२० क्युसेकने वाढवून १६,७८५ क्युसेक करण्यात आला. सकाळी ९ वाजता तो १,७२४ क्युसेकने कमी करून १५,०६१ क्युसेक करण्यात आला.

तो पुन्हा कमी करून सोमवारी (ता. २७) दुपारी ४ वाजता १२,६२० क्युसेक सुरू होता. तो मंगळवारी (ता. २८) पहाटे ५ वाजता १५,२४८ क्युसेक होता. ६ वाजता ४,४६९ क्युसेकने कमी करून एकूण १०,७७९ क्युसेक करण्यात आला. पुन्हा दुपारी ४ वाजता कमी करून ६,३१० क्युसेक सुरू होता, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

धरण विसर्ग (क्युसेक ता. २८ रोजी, ता. ४ वाजता)

दारणा ८०९७

मुकणे ५३९

कडवा बंद (ता.२७ दुपारी ४ वा. बंद)

गंगापूर बंद (ता.२८ सकाळी ६ वा. बंद)

जायकवाडीसाठी सोडवायचे पाणी (ता. २८ रोजी स्थिती)

धरण पाणी वाटप कोटा (दलघफू) सोडलेले पाणी (दलघफू)

दारणा १,८६० १,१०९ (सकाळी ६ वाजेपर्यंत)

मुकणे ४८४ १४७ (सकाळी ६ वाजेपर्यंत)

कडवा ३०२ ३०२ (कोटा पूर्ण)

गंगापूर ३५० ३५० (कोटा पूर्ण)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT