ZP School Education Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Rural Education : राजुरा तालुक्यात येत असलेल्या कढोली (बु.) या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Team Agrowon

Chandrapur News : कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्याचे चित्र आहे. राजुरा तालुक्यात येत असलेल्या कढोली (बु.) या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत प्रवेश घेतल्यास पालकांचे गृह आणि पाणीकर माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळा खेड्यापाड्यात सुरू झाल्याने मराठी शाळा ओसाड पडायला लागल्या. ग्रामीण भागातील पालकांचा, विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वळला आहे. याकरिता शाळा शुल्क भरून त्यांच्या मर्जीनुसार पुस्तक, गणवेश आणि इतर इव्हेंटचे शुल्क पालक देत असतो. याउलट जिल्हा परिषदेच्या शाळेत पुस्तक, गणवेश आणि इतर साहित्य मोफत मिळतात.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, असे असतानाही पालक जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवतात. त्यामुळे शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कढोली (बु.) येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने आता अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांचे गृह, पाणीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेची नवीन इमारत

गावातील शाळेची जीर्ण इमारत निर्लेखित केल्यामुळे शाळा समाज मंदिरात भरविल्या जात होती. त्यावेळेस विद्यार्थी पटसंख्या कमी झाली. शिक्षक संख्या चारवरून दोनवर आली. यानंतर शाळेची नवीन सुसज्ज इमारत तयार झाली आहे.=

शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी, गावातील शाळा टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी व इतर कोणीही जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुले-मुलींना पहिल्या वर्गात प्रवेश दिल्यास ग्रामपंचायतीचा गृहकर आणि पाणी कर माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- शैलेश चटके, सरपंच,  ग्रामपंचायत कढोली (बु.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT