Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : राज्यात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम सुरू : जयंत पाटील

Jayant Patil : राज्यात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Team Agrowon

Nashik News : राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने तीव्र नाराजी आहे. एक रुपयात पीकविमा देण्याची घोषणा झाली. मात्र वरचा हप्ता कंपनीला देण्यात आला. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना आता परतावा मिळत नसल्याची स्थिती आहे.

विमा कंपन्या आता वेगवेगळे नियम लावून शेतकऱ्यांना फसवत आहेत. त्या सांगत आहेत, की इथे हे पीक नव्हते, भरपाई मिळणार नाही. सरकारने हस्तक्षेप करून हे थांबवले पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे.

मात्र असे प्रत्यक्षात होत नसल्याने राज्यात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शुक्रवारी (ता. १) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार दीपिका चव्हाण, शिरीष कोतवाल, नितीन भोसले, पुरुषोत्तम आव्हाड, शेखर माने आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की कृषिमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी २५ टक्के अग्रिम पीकविमा व्यक्तिगत खात्यावर बँकेत जमा केला जाईल. त्याशिवाय दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा केली होती; मात्र एकाही शेतकऱ्याला तो मिळालेला नाही. कांद्याला २०० क्विंटल मर्यादित ३५० रुपये क्विंटलप्रमाणे अनुदान जाहीर केले; मात्र शेतकऱ्यांना दहा हजारांपेक्षा अधिक अनुदान अद्याप मिळाले नाही, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT