Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : हिंगोलीत पीक विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

Fraud of farmers : हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil Shinde

Hingoli News : मराठवाड्यातील पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थिती शेतकरी पीक विम्याची आशा लागून राहिली आहे. पिक विमा कंपनीच्या विरोधात हिंगोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आली आहेत. तर नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तत्काळ पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास दिले.

त्यानंतर कृषी विभाग आणि पीक विमा कंपन्यांकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, पीक विमा कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला आहे. अशा परिस्थितीमध्ये पिक विमा उतरवणाऱ्या आयसीआयसीआय लोंगबार्ड या पीकविमा कंपनीच्या विरोधात हिंगोली मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आयसीआयसीआय या कंपनीच्या पर्यवेक्षकांनी शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करताना स्वतःच परस्पर स्वाक्षऱ्या केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या वतीने चौकशी केल्यानंतर खोट्या सह्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर आता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT