Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : पुणे विभागात चार साखर कारखान्यांचे धुराडे बंद

Sugar Factory Update : सध्या २८ साखर कारखाने सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने हे साखर कारखाने बंद होतील. त्यानंतर तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : मार्च महिना मध्यावर आल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील ३१ पैकी चार साखर कारखान्यांनी हंगाम आटोपला आहे.

कारखानास्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सध्या २८ साखर कारखाने सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने हे साखर कारखाने बंद होतील. त्यानंतर तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

चालू वर्षी उसाची उपलब्धता अधिक असल्याने शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला.

चालू वर्षी उसाची उपलब्धता अधिक असल्याने शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला.

त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी उशिराने साखर कारखाने सुरू केले होते. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे धुराडे १० नोव्हेंबरनंतर पेटविले गेले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर कारखान्यांचाही गळीत हंगाम सुरू झाला.

पुणे विभागात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास ३१ साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे ऊस लागवडीत घट झाली आहे. ऊस तोडणी मजुरांसह यंत्रांद्वारे होत आहे.

उन्हाचा चटका वाढत असला, तरी अजूनही काही भागांत थोड्याफार प्रमाणात ऊस शिल्लक आहे. मात्र कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली आहे. अजून एप्रिल अखेरपर्यंत गळीत हंगाम आटोपला जाण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय झालेले उसाचे गाळप

जिल्हा सुरू कारखाने ऊस गाळप (मे. टन) साखर (क्विंटल) साखर उतारा

पुणे १४ ११६,८०,३१९ १२०,६७,३४५ १०.३३

सातारा १७ ८८,०३,९५५ ९२,०८,५०८ १०.४६

एकूण ३१ २०४,८४,२७४ २१२,७५,८५२ १०.३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT