Khandesh Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Rain News : जुलैतील पावसाने घेतले चार बळी

July Rain Data : जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात चार बळी गेले आहेत. तर २१ घरांची पूर्णतः पडझड झाली असून ५०८ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Amaravati News : जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात चार बळी गेले आहेत. तर २१ घरांची पूर्णतः पडझड झाली असून ५०८ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. मृत पावलेल्या चारपैकी एकाच्याही कुटुंबास व घर पडल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नाही.

जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसला तरी जुलैमध्ये मात्र अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत १०८ टक्के पाऊस झाला आहे. तब्बल ३०२ मिमी पाऊस झाला असून, या महिन्यात २७७ मिमी पाऊस अपेक्षित होता. या पावसाने जिल्ह्यातील नाल्यांना पूर आला. नाल्यांच्या पुरात अमरावती तालुक्यातील चार जण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

जून महिन्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची तातडीची मदत दिल्या गेली. मात्र जुलै महिन्यातील नाल्यांच्या पुरात वाहून गेलेल्या अमरावती तालुक्यातील चारही मृतांच्या कुटुंबीयांना मदत पुरवण्यात आलेली नाही.

जिल्ह्यात पावसामुळे घरांची पडझड झाली असून २१ घरे पूर्णतः बाधित झाली आहेत. यातील चार कुटुंबांना मदत देण्यात आली असली तरी १६ कुटुंब अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. पूर्ण घर पडल्याने इतरत्र आसरा घेऊन राहत असलेल्या या कुटुंबांना प्रशासनाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. तर अंशतः बाधित ५०८ प्रकरणांपैकी सर्व मदतीसाठी पात्र ठरली असली तरी त्यांनाही मदत मिळाली नाही. पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या २७८ व गोठ्यांची संख्या ४५ असली तरी त्यांनाही मदत पुरवण्यात आलेली नाही.

नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्यांना प्रशासनाचा मदतीचा हात दिलासा देणारा असतो. मात्र यावेळी प्रशासनाने अद्याप संवेदनशीलता दाखविलेली नाही. प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीने झालेले नुकसान भरून निघणारे नसले तरी तो आधार ठरतो. यावेळी प्रशासनाला हा आधार देण्यात विलंब मात्र होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील पडझड झालेली घरे

पूर्णतः २१ पाच कुटुंबीयांना मदत

अंशतः ५०८ मदत नाही

कच्चे घरे २७८ मदत नाही

जनावरांचे गोठे ४५ मदत नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT