Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Irrigation Projects: अठरा हजार कोटींच्या चार सिंचन प्रकल्पांना मान्यता

Cabinet Approval: राज्यातील चार मोठ्या सिंचन व जलप्रकल्पांना एकूण १८,६१७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळाने दिली. कोकण, खानदेश आणि रायगड जिल्ह्यांत हे प्रकल्प राबवले जाणार असून, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील विविध उपसा सिंचन योजना आणि प्रकल्पांसाठी १८ हजार ६१७ कोटी रुपयांची मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यता मंगळवारी (ता. २०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या.

यामध्ये सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५३२९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता, सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी, रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी, रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.

मौजे हेत जलसिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जलसिंचन प्रकल्पास २०२५.६४ कोटी रुपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जलसिंचन प्रकल्पामुळे वैभववाडी तालुक्यातील ४४७५ हेक्टर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये ८३५ हेक्टर असे एकूण ५३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे भूसंपादन करताना भविष्यात न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

‘पोशीर’ ला ६३९४ कोटी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास ६३९४.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस बैठकीत मंजुरी देण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर १२.३४४ टीएमसीचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८.७२१ टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी ७.९३३ टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी १.८५९ टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (३३.९६ टक्के, २१७१.४५ कोटी रुपये), नवी मुंबई महानगरपालिका (४२.५३ टक्के, २७८३.३७ कोटी रुपये), उल्हासनगर महानगरपालिका (९.५६ टक्के, ६११.२८ कोटी रुपये), अंबरनाथ नगर परिषद (७.०७ टक्के, ४५२.०६ कोटी रुपये), बदलापूर नगर परिषद (५.८८ टक्के, ३७५.९७ कोटी रुपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे.

‘शिलार’ला ४, ८६९ कोटी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर ६.६१ टीएमसी क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. या योजनेस ४८६९.७२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.

कनोली उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस ५३२९ हजार ४६ कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या विशेष पॅकेजमध्ये बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पावर मार्चअखेर २४०७.६७ कोटी खर्च झाला आहे. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ५३२९.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT