Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage Kolahpur : कुंभी मध्यम प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक

Water Crisis : तीन तालुक्यांतील ५४ गावांना सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा शिल्‍लक आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी कमी आहे.

Team Agrowon

Kolhapur News : तीन तालुक्यांतील ५४ गावांना सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा शिल्‍लक आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी कमी आहे. अणदूर, कोदे व वेसरफ या तीन लघुप्रकल्पांतही पुरेसा पाणीसाठा शिल्‍लक आहे. तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पामध्ये शिल्‍लक असलेला पाणीसाठा १५ जून अखेर सिंचनासाठी पुरेल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

गगनबावड्यात कुंभी हा मध्‍यम तर कोदे, अणदूर, वेसरफ हे लघू असे एकूण चार पाटबंधारे प्रकल्‍प आहेत. दरवर्षी हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. गगनबावड्यासह पन्‍हाळा व करवीर या तीन तालुक्ं‍यातील सुमारे ५४ गावांतील ८७११ हेक्टरमधील पिके सिंचनासाठी कुंभी मध्यम प्रकल्पावर अवलंबून आहेत.

या प्रकल्पातील पाणी कुंभी नदीत सोडले जाते. बॅक वॉटर पद्धतीने कळे बंधाऱ्यातून या प्रकल्पाचे पाणी धामणी नदीत सोडावे लागते. चालू वर्षी पाऊस लवकर परतल्याने पाण्याचे आवर्तन लवकर सुरू झाले. चालू उन्हाळ्यामध्ये म्हणावा तसा वळीव पाऊस बरसला नाही. प्रकल्पातील पाण्याचा जादा वापर झाला असल्या कारणाने गतवर्षीपेक्षा कुंभी प्रकल्पातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी आहे.

अणदूर लघुप्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो गत वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी आहे. वेसरफ लघुप्रकल्पात २७ टक्के साठा शिल्लक असून तो गत वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी आहे. कोदे लघुप्रकल्पात ३८ टक्के साठा असून तो गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के जादा आहे. सध्याचा साठा कुंभी, सरस्‍वती व रूपणी नदीकाठावरच्‍या गावांना १५ जून अखेर पुरविण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पाऊस लवकर परतल्याने व यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस न बरसल्याने तालुक्यातील तीन प्रकल्पांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. मात्र सर्वच प्रकल्पांमध्ये सध्या असलेला पाणीसाठा सिंचनासाठी १५ जूनअखेर पुरवण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- अजिंक्य पाटील, शाखाधिकारी, कळे पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT