Pune News : बिबट्यांचे हल्ले रोखण्याबरोबरच हल्ला झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने नगदवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाचा फायदा पूर्वपट्ट्यातील गावांना होणार असून, खेड आणि शिरूर भागांतील नागरीवस्त्यांमध्ये देखील अशा दलाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
बिबट्यांचे हल्ले रोखण्याबरोबरच हल्ला झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने नगदवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाचा फायदा पूर्वपट्ट्यातील गावांना होणार असून, खेड आणि शिरूर भागांतील नागरीवस्त्यांमध्ये देखील अशा दलाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
शीघ्र कृती दलाबाबत सातपुते म्हणाले, ‘‘सध्या ऊस तोडणी सुरू असून, उसासह केळीच्या बागा आणि शेतांमध्ये बिबट्यांचे बछडे सापडत आहेत. बछडे आईपासून (मादी बिबट्या) दुरावल्यानंतर मादी सैरभैर होऊन शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ले करत आहेत.
तसेच बिबट्या विहिरीत पडणे, पोल्ट्री किंवा गोठ्यात बिबट्या अडकणे, बिबट्यांकडून पशुधनांवर हल्ले होणे, तसेच मानवी हल्ले होणे, रस्त्यावर अपघातात बिबटे जखमी होणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडल्यानंतर घटनास्थळी कमी वेळात पोहचून या ठिकाणी पिंजरे आणि रेस्क्यू साहित्यासह बिबट्या पकडणे असे शीघ्र कृती दल तयार करण्यात येणार आहेत.
कृती दलाचे पहिले कार्यक्षेत्र ऊस पट्ट्यात आहे. यासाठी नगदवाडी (खोडद) येथे हे कृती दल कार्यरत असणार आहे. कृती दलाच्या कार्यारंभ कार्यक्रमाला साहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपाल भानुदास शिंदे, पूनम ढोबळे, अनिता होले, सुधाकर गीते, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, कैलास भालेराव, राजू गाढवे, विश्वनाथ बेले, सुदाम राठोड, कल्याणी पोटवडे, राजू जयधाने, रेस्क्यू टीमचे सदस्य दीपक माळी, सतीश घाडगे, भाऊ घोडे, जितेंद्र भोर, तुकाराम जाधव, किसन केदार, फुलचंद खंडागळे, रवी काळे, आकाश माळी, वन कर्मचारी बाळू वामन, बबन वामन उपस्थित होते.
बिबट्याचा एकाच वेळी ४ शेतकऱ्यांवर हल्ला
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २१) बिबट्याने केलेल्या तीन ठिकाणच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये एका मुलाचा समावेश आहे. सर्व जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
नितीन रामदास लांडे (वय ३५), विघ्नेश शशिकांत पदाले (वय २०) सोमनाथ किसन आढळराव पाटील (वय ४०) त्यांचा मुलगा विघ्नेश अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. लांडेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लांडेमळा येथे राहणारे नितीन रामचंद्र लांडे हे शेतातील पाणीपुरवठा योजनेचा वॉल बंद करण्यासाठी जात होते. त्यावेळी दबा धरून बसलेली बिबट्याची मादी व दोन पिल्ले अचानकपणे रस्त्यावर आली. पिल्ले सोबत असल्याने सैरभैर झालेल्या मादी बिबट्याने चौघांवर हल्ला केला.
या बिबट शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून बिबट प्रवण क्षेत्रात वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून दिवसा आणि रात्री गस्त घातली जाणार आहे. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधून जनजागृती केली जाणार आहे.- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.